सावंत परिवाराच्या वतीने कु. ज्ञानेश्वरी तोळमारे यांचे अभिनंदन
औसा- औसा तालुक्यातील टाका येथील रहिवासी सूर्यकांत तोळमारे यांची कन्या कु. ज्ञानेश्वरी तोळमारे हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा (२०२१) मध्ये उतुंग भरारी घेत राज्य कर निरीक्षक पदासाठी निवड झाली या यशाबद्दल कु. ज्ञानेश्वरी यांचे सावंत परिवाराच्या वतीने ॲड.शिवाजी सावंत यांनी यथोचित सत्कार करून अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
सामान्य कुटुंबात जन्मलेल्या कु ज्ञानेश्वरी यांनी अथक परिश्रमातून मिळवलेले यश हे अभिमानास्पद आहे.या यशाबद्दल कु ज्ञानेश्वरी सह तिचे वडील सूर्यकांत तोळमारे आई सौ अनिता तोळमारे यांचा सत्कार करून अभिनंदन केले. यावेळी टाका सोसायटीचे चेअरमन गोरख सावंत,सौ.सुलक्षणा पाटील, रणजित शिंदे, संभाजी सावंत सेवानिवृत्त केंद्रप्रमुख कमलाकर सावंत, संपादक किशोर जाधव यांच्यासह अनेक जण होते.
إرسال تعليق