अपयश म्हणजे शेवट नव्हे रे भाऊ

अपयश म्हणजे शेवट नव्हे रे भाऊ


आजचा दिवस तसा अनपेक्षितच कारण मी जरी कुठल्याही मुख्य परीक्षेला नसलो तरी जवळचे काही सोबती निकालाच्या प्रतीक्षेत होते.स्पर्धेच्या या विश्वात गेल्या काही वर्षांत हे निकालाचे क्षण अनुभवुन झाल्याने त्यांची उत्सुकता मी समजू शकत होतो.निकालाच्या धडकीने रात्री कोणालाच झोप लागत नाही हे स्पर्धेचे गमक पुन्हा एकदा पाहायला मिळाल.शेवटी निकाल लागला तो तसा सर्वांच्या अपेक्षेपेक्षा थोडा जास्तच लागला.काहीना यश मिळालं तर काही मात्र स्पर्धेची लक्ष्मणरेषा पार करु शकले नाहीत हे तर होणार होतं पण आजच्या काळात फक्त निकाल बोलतात हे अजुन एक वास्तव सत्य समोर आलं.तुमचा अभ्यास किती,तुमचा निकाल किती मार्काने गेला ह्या फक्त पोकळ चर्चाच ज्यातून  हाती उरतो तो मनस्तापच.लोक आपल्या माघारी काय बोलत असतील याचा नुसता विचार जरी डोक्यात आला तर डोळ्यात खळकरुन पाणी कधी येईल हे कळत सुध्दा नाही.यशाच कौतुक तर प्रत्येकांना असतंच पण अपयशी लोकांना समजुन घेणारा फार कमी वर्ग या जगात उरलाय म्हणून हे लिहण्याच धाडस केलय......
खरं आहे की यश प्रत्येकांना हवं आहे पण स्पर्धेच्या जागा आणि तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या यांची तफावत पाहता काही जनांना अपयश तर येणारच.प्रत्येक आई-बापाला आपलं लेकरु अधिकारी व्हायचं असं वाटन साहजिकच आहे पण प्रत्येक वेळी सर्वांचीच स्वप्न कशी पुर्ण होणार?
स्वप्न पुर्ण झालं नाही याचा अर्थ ते गाठण्याची संधी संपली असं थोडच आहे त्यामुळे हाताश न होता पुन्हा एकदा तयारीला लागन हेच तर एका योध्द्याच लक्षण.स्पर्धेच्याया विश्वात वैराग्य धारण करुन अहो रात्र झटणाऱ्या माझ्या सर्व सहाकाऱ्यांना एवढीच विनंती आहे की कोणी यशस्वी झालं म्हणून हुरळुन जाऊ नये आणि कोणी अपयशी झालं म्हणून खचुन जाऊ नये.यश -अपयश तर फक्त एक आयुष्यातला टप्पा आहे कोणी आज गाठला असेल कोणी उद्या गाठेल त्यासाठी आजच्या दिवसाला आयुष्याचा भाग म्हणून जगुन घ्या आणि उद्याला पुन्हा एक नवी सुरुवात करा तुमच यश तुमची वाट पाहतय यांची जानीव मात्र सदोदित अंत:करणात ठेवा.......
.................. धन्यवाद
  @ किशोर जाधव 
                    

Post a Comment

أحدث أقدم