हासेगाव फार्मसीत चार दिवसीय कार्यशाळा

हासेगाव फार्मसीत चार दिवसीय कार्यशाळा 





औसा प्रतिनिधी- औसा तालुक्यातील हासेगाव येथील  श्री वेताळेश्वर शिक्षण संस्थे अंतर्गत लातूर कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयात रुबीकॉन ट्रेनिंग आउटलेट च्या संयुक्त विद्यमाने रोजगार कौशल्य आणि व्यक्तिमत्व विकास या विषयावर चार दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले . या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सॉफ्ट स्किल ट्रेनर आणि कम्युनिकेशन कोच , तज्ञ प्रशिक्षक कु .दिव्या धाडवे , प्राचार्या डॉ. श्यामलीला बावगे ( जेवळे ) डॉ. लोणीकर नितीन आदी उपस्थित होते . या प्रसंगी प्रास्तविक पर भाषण प्राचार्या डॉ. श्यामलीला बावगे ( जेवळे ) यांनी विद्यार्थ्याचा व्यक्तीमत्व विकास आणि स्टेज करेज असणं खूप गरजेचे आहे.असे थोडक्या शब्दात विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले . त्याचबरोबर सॉफ्ट स्किल ट्रेनर आणि कम्युनिकेशन कोच , तज्ञ प्रशिक्षक कु .दिव्या धाडवे विद्यार्थ्यांना व्यक्तीमत्व विकास आणि संवाद कौशल्य या विषयावरती सविस्तर माहिती दिली . त्याचबरोबर विधार्थ्यांनी मुलाखत कशी दिली पाहिजे मुलाखतीची तयारी कशी केली पाहिजे आपली बॉडीलँग्वेज , आत्मविश्वास , चेहऱ्यावर हसू तसेच डोळ्यात डोळे टाकून बोलावे , संवाद स्पष्ट पणे साधावा , योग्य भाषा निवड अशा अनेक मुद्यावरती मौल्यवान मार्गदर्शन केले . या प्रसंगी या कार्यक्रमाचे समन्वयक प्राचार्या डॉ.श्यामलीला बावगे ( जेवळे ) सह समन्वयक प्रा.पटेल आयेशा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन प्रा.पटेल आयेशा यांनी केले .

Post a Comment

أحدث أقدم