गोपाळबुवा सार्वजनिक ग्रंथालयात रविवारीदिवाळी अंकांचे प्रदर्शन-गुणवंतांचा सत्कार

गोपाळबुवा सार्वजनिक ग्रंथालयात रविवारी
दिवाळी अंकांचे प्रदर्शन-गुणवंतांचा सत्कार


लातूर- माळकोंडजी ता.औसा येथील गोपाळबुवा सार्वजनिक ग्रंथालयाच्यावतीने रविवार,दि.१३ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी १०.३० वाजता दिवाळी अंकांचे प्रदर्शन व गुणवंतांचा सत्कार समारंभ आयोजिला असून,डॉ.सूर्यनारायण रणसुभे यांच्या हस्ते दिवाळी अंक प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.
सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी जिल्हा शासकीय ग्रंथालय अधिकारी सुनील गजभारे हे राहणार असून, यावेळी ४२ मराठवाडा साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष प्रा.डॉ.शेषराव मोहिते,श्री. अनंतपाळ शिक्षण संस्थेचे सचिव प्रभाकरराव कुलकर्णी,कुमारस्वामी महाविद्यालयातील माजी ग्रंथपाल प्रा.विजयकुमार मिश्रा,डॉ.डी.टी.घटकार, गोपाळबुवाची पोथी व जीवनगाथा लिहिणारे लेखक मधुकर कुलकर्णी व आदिवासी मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी कार्यरत बलभीम भालेराव हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभणार आहेत.
याप्रसंगी सामाजिक न्याय विभागाच्या आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त ज्योती महाळंगीकर,ग्रंथालय शास्त्र नेट परीक्षा उत्तीर्ण पल्लवी अडसुळे आणि जयप्रकाश हराळे यंाचे चिरंजीव जर्मनीला उच्च शिक्षणासाठी गेल्याबद्दल या गुणवंतांचा सत्कार करण्यात येणार आहे.
तरी माळकोंडजी पंचक्रोशीतील साहित्य,शिक्षण क्षेत्रासह वाचक प्रेमींनी जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन गोपाळबुवा सार्वजनिक ग्रंथालयाचे सचिव ग्रंथमित्र पांडुरंग अडसुळे, उपाध्यक्ष सोपान कांबळे, कोषाध्यक्ष विठ्ठल अडसुळे, सदस्य प्रकाश विभूते,ज्ञानोबा माळी,मारुती बरडे, आनंद आडसुळे ग्रंथपाल शिवलींग अडसुळे,लिपीक रामलिंग अडसुळे आदिंनी केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم