मतदार संघातील शेवटच्या गावापर्यंत विकास निधी पोहचवणार : माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री आ. संजय बनसोडे

मतदार संघातील शेवटच्या गावापर्यंत विकास निधी पोहचवणार : माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री आ. संजय बनसोडे


उदगीर : मतदार संघातील अनेक गावे आजही अशी आहेत जेथे आजपर्यंत विकास निधी पोहचला नाही. त्यामुळे त्या भागातील ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत होती. त्यापैकी आपले बोरगाव हे गाव ही मतदार संघातील शेवटच्या गाव आहे त्यामुळे की काय हे गाव विकासापासुन वंचित होते. पावसाळ्यात अतिवृष्टी झाली की आपल्या गावचा संपर्क तुटायचा त्यामुळे ग्रामस्थांना याचा नाहक त्रास होत होता. ही बाब माझ्या लक्षात आल्यानंतर आपल्या बोरगाव गावातील पुल नव्याने बांधण्यासाठी पाठपुरावा करुन ३ कोटी रुपयाचा पुल मंजूर करुन घेतला त्याचे भुमीपुजन आज आपण केले. त्याचबरोबर आपल्या गावात जलजीवन मिशन अंतर्गत  ७८ लाख रुपयाच्या पाणीपुरवठा योजनेचाही शुभारंभ आज करण्यात आला.ते बोरगाव गावाजवळील मोठ्या पुलाचे जोड रस्त्यासह बांधकाम भुमीपुजन सोहळ्या प्रसंगी बोलत होते.
यावेळी माजी जि.प. सदस्य ज्ञानेश्वर पाटील,
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष समीर शेख, प्रा.श्याम डावळे, माजी उपसभापती ज्ञानोबा गोडभरले,  उप अभियंता एल.डी. देवकर, पाणीपुरवठा विभागाचे उप अभियंता एस.पी. गर्जे, बांधकाम विभागाचे शाखा अभियंता मोहम्मद फारुख, बोरगावचे सरपंच ज्ञानोबा इंगळवाड, धडकनाळचे सरपंच बालाजी परकड, उपसरपंच एकनाथ गोजेगावे, हणमंतराव पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष नागोराव पाटील, चेअरमन देविदास करकोळे, विनायक झिपटे, सुदाम बिरादार, मारोती जाधव, मारोती बोरगावकर, भास्कर पाटील, शिवाजी गोजेगावे, कंत्राटदार संजय पाटील तोगरीकर,  आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना आ.संजय बनसोडे यांनी, भविष्यात आपल्या गावाला कसलीही आपत्ती आली तरी पुराच्या पाण्याचा धोका होणार नाही म्हणून आपण ३ कोटी रुपये पुल मंजूर केला आहे. त्यासोबतच आपल्या गावातील पाणी टंचाई लक्षात घेवुन जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठ्याची योजना आणली. आपला उदगीर जळकोट मतदार संघ हा डोंगरी भाग असल्याने आपल्या भागात पाणी टंचाई भासत होती म्हणून  मतदार संघातील १२९ गावासाठी ५०० कोटीची वाटरग्रीड योजना आणली. बोरगाव हे मतदार संघातील शेवटचे असूनही केवळ या गावातील ग्रामस्थांची गैरसोय दुर करावी म्हणून बोरगावच्या विकासासाठी जवळपास ४ कोटी रुपयाचा निधी दिला आहे. भविष्यातही आपल्या गावच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. आपल्या गावातील शाळेसाठी येथील शिक्षकांनी निधी मागितला याचे समाधान वाटते यापुढील काळात आपल्या भागातील विविध शाळेंच्या समस्यावर आपण निधी उपलब्ध करुन देवु असे सांगितले.बोरगाव येथील. रा.म.मा.क्र. ६३ ते धडकनाळ बोरगाव ते राज्य सरहद्द मार्ग इतर जिल्हा मार्ग - ५६ रस्त्यावर बोरगाव गावाजवळील मोठ्या पुलाचे जोड रस्त्यासह बांधकाम भुमीपुजन सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमास धडकनाळ, बोरगाव या गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم