राज्यपाल कोश्यारी यांच्या विधानाचा विरोध म्हणून औसा बंद
औसा (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना इतर व्यक्तींशी केल्याने राज्यात जागोजागी बंदचे आव्हान केले जात आहे. या बंदला जागोजागी पाठिंबाही मिळत आहे.याचाच भाग म्हणून औसा शहरात 25 नोव्हेंबरला औसा बंद चे आवाहन सर्व शिवप्रेमींनीच्या वतीने करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व भाजपा प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक व चुकीचे विधान केल्यामुळे समस्त शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या परंतु केंद्र सरकार याची गंभीर दखल न घेता अश्या प्रवृतीवर कुठलीही कार्यवाही करत नसल्या कारणाने औसा शहर व तालुक्यामधील समस्त शिवप्रेमींच्यावतीने दिनांक 25 नोव्हेंबर वार शुक्रवार रोजी औसा शहर व तालुका बंदचा निर्णय घेण्यात आलेला आहे.तरी औसा शहर व तालुक्यातील मधील सर्व शिवप्रेमी नागरिकांनी तसेच सर्व पक्ष-संघटनांच्या कार्यकर्त्यांनी किल्ला मैदान औसा येथे दि.25 रोजी ठीक सकाळी 9 वाजता आपली दुचाकी घेऊन बंदच्या रॅलीमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
إرسال تعليق