बाभळगाव महाविद्यालयात हिंदी निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न

 बाभळगाव महाविद्यालयात हिंदी निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न





बाभळगाव : कै. व्यंकटराव देशमुख महाविद्यालय, बाभळगाव येथे हिंदी विभागाच्या वतीने हिंदी दिवसाचे औचित्य समोर ठेवून हिंदी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महाविद्यालय स्तरावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेतील विजेत्यांचे बक्षीस वितरण प्रमुख पाहुणे महात्मा फुले महाविद्यालय, किणगाव येथील प्राचार्य डॉ. बबनराव बोडके उपस्थितीत संपन्न झाले.
        निबंध स्पर्धेमध्ये " आजादी के 75 वर्ष क्या पाया क्या खोया " या विषयावर महाविद्यालयातून निबंध मागविण्यात आले. त्यामध्ये कु. कांबळे श्वेता सिद्धार्थ प्रथम, कु.वाघमारे स्वाती लहू द्वितीय तर कु. जाधव स्नेहा माधव तृतीय क्रमांक मिळवल्या बददल त्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
          कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रभारी प्राचार्य डॉ. दुष्यंत कटारे यांनी भूषविले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदी विभाग प्रमुख डॉ. रणजीत जाधव यांनी केले. यावेळी ओंकार सुरवसे, पूनम लव्हरे, श्वेता कांबळे, कु. स्वाती वाघमारे यांनी हिंंदी दिवसाचे महत्व आपल्या मनोगतातून व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शिवाजी कोरे यांनी तर आभारप्रदर्शन डॉ. माधव गायकवाड यांनी केले. 
                कार्यक्रम यशस्वीतेसाठी अकुंश थडकर, नितीन पाटील, दत्ता फुलगामे, बालाजी देशमुख यांनी परिश्रम घेतले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी, आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم