हिप्परसोगा सरपंचपदी शिवसेनेचे मनोज सोमवंशी

हिप्परसोगा सरपंचपदी शिवसेनेचे मनोज सोमवंशी 



 औसा प्रतिनिधी- तालुक्यातील हिप्परसोगा येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष्याचे महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाचे उपसभापती संतोष सोमवंशी यांचे बंधू मनोज माधवराव सोमवंशी सरपंच म्हणून व सात सदस्य विजयी झाले. 
 औसा तालुक्यातील हिप्परसोगा ग्रामपंचायतसाठी मोठ्या चुरशीची लढत होती. दि.18 डिसेंबर रोजी हिप्परसोगा ग्रामपंचायत साठी मतदान झाले,अत्यंत चुरशील लढत समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदाचे आरक्षण सर्वसाधारण पुरुष साठी आरक्षित असल्याकारणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. आज त्याचा निकाल लागला व महाराष्ट्र राज्याचे बाजार महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाचे उपसभापती संतोष सोमवंशी यांचे बंधू मनोज सोमवंशी सरपंच व सदस्य म्हणून आकाश सोमवंशी, बळीराम आळंदकर, विशाल कांबळे, मीराबाई चेवले, सुमित्रा गोरे, भामाबाई आळंदकर, भारतबाई चित्तापुरे इत्यादी सदस्य निवडून आले. नवनियुक्त सरपंच व सर्व सदस्यांचा सत्कार महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाचे उपसभापती संतोष सोमवंशी यांच्या हस्ते औसा खरेदी विक्री संघ येथे करण्यात आला. त्यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती संघाचे उपसभापती किशोर जाधव, तालुकाप्रमुख सतीश शिंदे, युवा सेना जिल्हाप्रमुख दिनेश जावळे, उपतालुकाप्रमुख किशोर भोसले, संतोष सूर्यवंशी,मारुती मगर, गणेश जाधव यांच्यासह खूप मोठ्या संख्येने हिप्परसोग येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم