अपयशाचे संधीत रुपांतर करा- डॉ. लहाने







निलंगा : शहरातील  प्रा. डॉ. तरंगे यांच्या श्री कोचिंग क्लासेसच्या अकरावी, बारावी, नीट, जेईई, सातवी ते दहावी फौउंडेशन बॅचेसचा एक्सपर्ट व भारतातील नामांकित फॅकल्टीच्या सह्याने 'यशाचा पासवर्ड' कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.




 जीवन यशस्वी बनविण्यासाठी कठीण परिश्रम घेतले पाहिजे. एखाद्या वेळी अपयश आले तरी चालेल मात्र आलेल्या त्या अपयशाचे संधीत रुपांतर करुन विद्यार्थ्यांनो आपल्या अभ्यासात नियमितता ठेवल्यास यश नक्की प्राप्त होते, असे प्रतिपादन जगप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉ. विठ्ठल लहाने यांनी केले.
अध्यक्षस्थानी व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रल्हाद बाहेती हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रचिती कम्प्यूटरचे सर्वेसर्वा उदय पाटील, प्रा. डॉ. गजेंद्र तरंगे उपस्थित होते.डॉ. लहाने म्हणाले की, मी हजारो विद्यार्थ्यांशी मी सोशल मीडियाच्या माध्यमातून जोडला गेलो आहे. माझ्या घरातील परिस्थिती प्रतिकूल असतानाही अभ्यासातील सातत्यामुळे मला १४ गोल्ड मेडल मिळाले असून ते  रेकॉर्ड तोडण्याचे काम तुम्ही करा. विद्यार्थी जीवनामध्ये बुलेटप्रुफसारखे ध्येय ठेवून वाटचाल करा, आई वडिलांची सेवा करा, जीवनात खचून जाऊ नका. कारण नापास झालेले विद्यार्थीच मोठे होतात. हा इतिहास आहे. तुमचा आय क्यू चांगला असेल तर तुम्ही गुणवंत आहात . ई - क्यू अर्थात भावनांक चांगला असेल, तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल भावनांक अर्थात तुम्ही आई- वडिलांशी कुटुंबाशी घट्ट जोडून राहा . त्याच्या कष्टाची जाणीव ठेवा. असे सांगत, डॉ. लहाने यांनी स्वतःच्या आयुष्यातील अनेक प्रसंग सांगितले. प्रास्ताविक प्रा.डॉ.गजेंद्र तरंगे यांनी केले. सूत्रसंचलन प्रा. सोमेश्वर स्वामी व आभार आभा तरंगे यांनी मानले.

Post a Comment

أحدث أقدم