मुक्तांगण इंग्लिश स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा

 मुक्तांगण इंग्लिश स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा





लातूर :- शहरातील विशाल नगर परिसरातील साई मंदिर समोरील मातोश्री कलावती प्रतिष्ठान संचालित

मुक्तांगण इंग्लिश स्कूलमध्ये चिमुकल्यानी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला.  

या प्रसंगी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला.

त्यानंतर स्कूल कमिटीचे चेअरमन रविशंकर मुंढे  यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी संस्था

संचालक युवराज जाधव, शाळेच्या प्राचार्या सुमेरा शेख यांच्या समवेत सर्व शिक्षिकांची उपस्थिती होती. 

          प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शाळेने स्पीच काँपिटिशनचे आयोजन केले होते. या स्पर्धेमध्ये

चिमुकल्यांनी त्यांच्या स्पीच चे खूपच उत्तमरित्या सादरीकरण केले. या कार्यक्रमाला बहुसंख्य पालक उपस्थित

होते. यावेळी प्रथम, द्वितीय आणि तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्याना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शाळेच्या शिक्षिका कीर्ती पाटील यांनी केले.   कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी

शाळेच्या शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

أحدث أقدم