आम आदमी पार्टी कडून प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा व आप युवाघडीतर्फे प्रजासत्ताक पदयात्रा संपन्न




आम आदमी पार्टी कडून प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा व आप युवाघडीतर्फे प्रजासत्ताक पदयात्रा संपन्न
 लातूर : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने खडगाव  रोड संभाजीनगर येथे गुरुवार दि. २६ जानेवारी २०२३ रोजी सकाळी आम आदमी पार्टी लातूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रताप भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. प्रारंभी राष्ट्रपिता महात्मा गांधीजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेस  महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून  पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व यावेळी जिल्हाध्यक्ष प्रताप भोसले यांनी सर्व कार्यकर्त्यांना प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व सांगितले व तसेच यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी आम आदमी पार्टीमध्ये पक्षप्रवेश केला
तर यावेळी आप युवा आघाडी जिल्हा संघटक ओंकार गोटेकर जिल्हा उपाध्यक्ष विजय आचार्य भागवत कारंडे युवा आघाडी जिल्हा उपाध्यक्ष आकाश मोठेराव शहराध्यक्ष सिद्धेश काळे शहर सचिव सचिन औरंगे भाग्यश्री कांबळे विशाखा कांबळे विश्वंभर कांबळे सचिन आदमाने गुणाजी साबळे आदींची उपस्थिती होती
आम आदमी पार्टी युवा आघाडी कडून गांधी चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क इथपर्यंत पदयात्रा काढण्यात आली व या पदयात्रेमध्ये भारत माता की जय इन्कलाब जिंदाबाद आम आदमी पार्टीचा विजय असो भ्रष्टाचार का एकही काल केजरीवाल केजरीवाल अशा अनेक घोषणाही देण्यात आल्या तर यावेळी युवा नेते विक्रांत शंके यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त पदयात्रा काढण्यामागची पार्श्वभूमी कार्यकर्त्यांना समजून सांगितली आणि युवा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले तरी या रॅलीमध्ये जिल्हाध्यक्ष प्रताप भोसले जिल्हा संघटक दीपक काणेकर युवा आघाडी जिल्हाध्यक्ष श्याम माने, जिल्हा संघटक ओंकार गोटेकर युवा आघाडी जिल्हा उपाध्यक्ष आकाश मोठेराव आप युवा आघाडी जिल्हा सचिव प्रणय पोटभरे आप युवा आघाडी शहराध्यक्ष साहिल तांबोळी शहर सचिव विवेक वाघमारे रोहन सूर्यवंशी गणेश नागतळे नितीन सूर्यवंशी सलीम सय्यद ओम अडगळे शुभम वाघमारे सोहम सूर्यवंशी पवन माने कमरण इनामदार कृष्ण किसवे, ओमकार पवार आधी युवा गाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये सहभागी झाले होते

Post a Comment

أحدث أقدم