पुस्तकाची गोडी स्क्रीनच्या अतिरेकाना पर्याय -राजन लाखे

पुस्तकाची गोडी स्क्रीनच्या अतिरेकाना पर्याय -राजन लाखे








 लातूर - आजकाल लहानापासुन ते थेेट वृध्दापर्यंत शहरी असो की ग्रामीण प्रत्येकजण आपला किंमती वेळ, उर्जा,क्रयशक्ती व पैसा वाया घालतो आहे.त्याऐवजी बालवयापासुन पुुस्तक वाचनाची गोडी शाळा कॉलेेजपासुन लावायला हवी गावात, शहरात लहानमोठी साहित्य संमेलने व्हायला हावीत असे मत अ.भा.बालकुमार साहित्य संस्था पुणे चे अध्यक्ष राजन लाखे यांनी लातूर येथील प्रकाशनगरातील सरस्वती विदयालयात आयोजित पहिल्या बालकुमार साहित्य समेलन व लातूर शाखेचे उदघाटन प्रसंगी व्यक्त केले.त्यावेळी व्यासपीठावर संम्मेलानाध्यक्ष बालसाहित्यीक प्रकाश घादगिने,
लातूर शाखा अध्यक्ष रमेश चिल्ले,सचिव नागनाथ कलवले,केंद्रीय कार्यकारिणी सदस्य,बालविकास शिक्षण संस्थेचे सचिव अ‍ॅड.लक्ष्मणराव भागवत उपस्थित होेते.सम्मेलंनाचे प्रास्ताविक शाखाध्यक्ष रमेश चिल्ले यांनी सम्मेलना मागील व शाखेबददल भुमिका विषद केली. पुढील काळात बालसाहित्य पुरस्कार, पुस्तक प्रकाशने व साहित्यीक उपक्रम घेण्यात येणार असल्याचे सांगीतले.तसेच अगामी काळात अखिल भारतीय बाल साहित्य संमेलन घेण्याबददल  सांगितले. संमेलाना अध्यक्ष प्रकाश घादगिने यांनी बालसाहित्याचा आढावा घेतला.
तर अ‍ॅड.भागवत यांनी आमच्या शाळेचे भाग्य आहे की एवढी मोठी साहित्यीक आमच्या संस्थेत येवुन मुलांना मार्गदर्शन करतात नक्कीच पुढील काळात यातून भावी साहित्यीक घडण्यास मदत होणार आहे.
 याच कार्यक्रमात राज्य शासनाचा बालकथेचा साने गुरूजी बालकाव्य पुरस्कार मिळाल्याबददल वृषाली पाटील याचा व स्वाराती विदयापीठाच्या राज्यपाल नियुक्त सदस्यपदी नियुक्ती झाल्याबददल उमा व्यास तसेच भारत सरकारचा पुरस्कार मिळाल्याबददल सविता धर्माधिकारी या तिन्ही  सदस्याचां मान्यंवराचे हस्ते स्मृतीचिन्ह , शाल, पुस्तके देवुन सत्कार करण्यात आला.
 कथाकथन सत्रात केेंद्र्रीय कार्यकारीचे सचिव डॉ.दिलीप गरूड व जी.जी.कांबळे यांची मुलांना गोष्टी मध्ये हसायला व अंंतर्मुख होण्यास भाग पाडले. भारत सातपुतेच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कविसंमेलनात रमेेश चिल्ले, नाथनाथ कलवले,कल्याण राऊत,उषा भोसले,शैलजा कांरडे,नयन राजमाने,दतप्रसांद झंवर,गोविद गारकर,सुलक्षणा सोनवणे,सुनिता मोटे, सविता धर्माधिकारी,सुनिता देशमुुख,विजया भणगे,रमेश हणमंते,निलीमा देशमुख व मुलांनी ही कविता सादर केली.
 याप्रसंगी उपमुख्याध्यापक आर.डी.कुलकर्णी,राजकुमार गायकवाड,पंडीत देवकते,भस्मे मॅडम,श्रीमंगले सर  शाळेतील शिक्षक,विदयार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
 संपुर्ण संम्मेलनांचे सुत्रसंचलन सुनिता देशमुख यांनी तर आभार प्रदर्शन राजकुमार दाभाडे यांनी मानले.

Post a Comment

أحدث أقدم