परीक्षा पे चर्चा उपक्रमात खासदार सुधाकर शृंगारे यांनीही रेखाटले चित्र

 परीक्षा पे चर्चा उपक्रमात खासदार सुधाकर शृंगारे यांनीही रेखाटले चित्र

खासदारांनी दिल्या अनेक शाळांना भेटी


(लातुर-प्रतिनिधी)   -- भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून "परीक्षा पे चर्चा" हा उपक्रम देशभर राबविण्यात येत आहे. लातुर शहर आणि जिल्ह्यातल्या अनेक शाळांमध्ये आज या निमित्ताने चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.लातुर शहरातल्या  सुदर्शन विद्यालय आणि  विद्या विकास विद्यालयात सुरु असलेल्या चित्रकला स्पर्धेस खासदार  सुधाकर शृंगारे यांनी भेट देत,मुलांचा उत्साह वाढवला. खासदार सुधाकर शृंगारे यांनी मुलांसोबत चित्रात रंग भरल्याने मुले प्रफुल्लित झाली.  
--सध्या मुलांच्या  परीक्षेचा काळ असल्याने ,त्यांच्या मनावरील परीक्षेचे दडपण काहीसे मोकळे व्हावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून परीक्षा पे चर्चा हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. परीक्षा पे चर्चा या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहलेल्या पुस्तकांचे प्रकाशन 27 जानेवारी रोजी करण्यात येणार आहे. प्रकाशना नंतर पंतप्रधान देशातील विद्यार्थ्यांशी परीक्षे संदर्भात संवाद साधणार आहेत. परीक्षा पे चर्चा उपक्रमाच्या निमित्ताने खासदार सुधकार शृंगारे यांनी लातुरच्या सुदर्शन विद्यालय आणि विद्या विकास विद्यालयाला भेट देत तेथे सुरू असलेल्या चित्रकला स्पर्धेची पाहणी केली. मुलांशी संवाद साधत खासदार शृंगारे  यांनी मुलांच्या अनेक प्रशांची उत्तरे दिली.   भारतीय जनता पार्टीच्या वतीने लातुर शहर आणि जिल्ह्यातल्या अनेक शाळांमध्ये परीक्षा पे चर्चा उपक्रमा निमित्ताने चित्रकला स्पर्धे चे आयोजन केले होते.या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी मोठा प्रतिसाद दिला आहे

Post a Comment

أحدث أقدم