७४ व्या प्रजासत्ताक दिना निमित्त व्हील चेअर चे वाटप
औसा-रत्नाकर औसेकर यांच्या प्रेरणेतून दानशूर देणगीदार यांच्या सहकार्यातून गोरगरीब अपंग गरजूं व्येक्तीना ज्यांना चालता येत नाही .अशा व्यक्तींना व्हीलचेअरच वाटप .26 जानेवारी ७४ व्या प्रजासत्ताक दिना निमित्त व्हील चेअर चे वाटप करण्यात आले. लाभार्थ्यासाठी लाभ मिळून देण्यासाठी प्रयत्न करणारे औसा तालुक्यातील राजेंद्र मोरे राजीव कसबे नारायण नरखेडकर यांच्या प्रयत्नातून लातूर जिल्ह्याभरातील औसा तालुक्यासह 50 लाभार्थ्यांना व्हील चेअर देण्यात आल्या लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मनस्वी समाधान वाटले .खरंच अशा अपंग व्यक्तीसाठी काम करणं म्हणजे एक प्रकारची प्रवणीच आहे . अशा व्यक्तीसाठी किती ही सहकार्य केलं तेवढे कमीच आहे . देणगीदार व लाभार्थी यांच्यामधील एक दुवा म्हणून असंच काम करत राहू समाजातील तळागाळातील लोकांनी अपंगासाठी सहकार्य करावे एवढीच भावना यावेळी राजेंद्र मोरे यांनी व्यक्त केले .
व्हील चेअर चे वाटप माजी . खा . गोपाळराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी रत्नाकर औसेकर , पत्रकार रामेश्वर बद्दार , जयंत कथवटे , नारायण नरखेडकर उपस्थित होते
إرسال تعليق