रामनाथ विद्यालय येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात

 रामनाथ विद्यालय येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात 


आलमला :--श्री रामनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आलमला. येथे  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.सर्वप्रथम विद्यालयाच्या प्रांगणामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन सातवीत  शिकणाऱ्या विद्यार्थिनी कु. हर्षदा बिराजदार, कु.गौरीषा धाराशिवे कु.समृद्धी कदम,  यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर विद्यालयातील वेगवेगळ्या मुला-मुलींनी सावित्रीबाईच्या, महात्मा फुले यांच्या वेशभूषेमध्ये येऊन त्यांच्या जीवन कार्याविषयी आपली नाटिका सादर करून  फुले दांपत्याने केलेल्या कार्याचा उजाळा विद्यार्थ्यांसमोर सादर केला.याप्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.अनिता पाटील, पर्यवेक्षक पी. सी. पाटील, क्रीडा शिक्षक  एल.पी. बिराजदार,  रंगनाथ आंबुलगे  व विद्यालयातील सांस्कृतिक विभाग प्रमुख भास्कर सूर्यवंशी, सौ. जे. आर. हिंगणे, सौ.  एस. एस. निलंगेकर,  सौ. आमरजा उकरडे यांनी विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याविषयीची दिलेली माहिती अत्यंत मोलाची ठरली. याप्रसंगी नरसिंग पंडगे,  प्रशांत हुरदळे,तसेच इतर  शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم