रामनाथ विद्यालयात "ग्रंथालय शाळेच्या दारी" उपक्रमाचा उद्घाटन सोहळा संपन्न.
 आलमला:-श्री रामनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आलमला.ता. औसा येथे आलमला येथील  विवेकानंद वाचनालयाच्या वतीने विद्यार्थी सभासद मोफत नोंदणी शुभारंभ व "ग्रंथालय शाळेच्या दारी" उपक्रमाचा उद्घाटन सोहळा दि.6जानेवारी 2023 रोजी विद्यालयांमध्ये उद्घाटक मा. श्री सुनील गजभारे. जिल्हा ग्रंथालय अधिकारी लातूर, यांच्या शुभहस्ते करण्यात आले .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री.विश्वनाथ बिराजदार चेअरमन विविध कार्यकारी सोसायटी आलमला हे उपस्थित होते.तर प्रमुख अतिथी म्हणून श्री राम कापसे शिक्षण विस्तार अधिकारी औसा,  श्री राम मेकले अध्यक्ष मराठवाडा विभाग ग्रंथालय संघ औरंगाबाद,  श्री हावगीराव बेरकीळेअध्यक्ष जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय संघ लातूर, श्री जयशंकर हुरदळे माजी संचालक मांजरा कारखाना, श्री बसवराज धाराशिवे सचिव विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ अलमला,  श्री महादेव खिचडे अध्यक्ष औसा तालुका कर्मचारी सहकारी पतसंस्था औसा,  व्हॉइसचेअरमन अहमद तांबोळी विविध कार्यकारी सोसायटी आलमला,  विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.अनिता पाटील मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. सर्वप्रथम मान्यवरांचा विवेकानंद वाचनालयाच्या वतीने शाल पुष्पहार पुष्पगुच्छ आणि ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना विवेकानंद वाचनालयातर्फे तर्फे मोफत ग्रंथ  देऊन त्यांना वाचनालयाचे सभासद करून नियमित वाचक बनण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन विवेकानंद वाचनालयाच्या वतीने विद्यालयात करण्यात आले होते .या कार्यक्रमाचे प्रास्ताविक  कार्यक्रमाचे संयोजक विवेकानंद वाचनालयाचे सचिव प्रभाकर कापसे यांनी केले.तसेच याप्रसंगी राम कापसे व हावगीराव बेरकीळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील गजभारे साहेब सर्व विद्यार्थ्यांना विद्यार्थी सभासद होऊन ग्रंथालयाचे आपण एक आदर्श वाचक बनावे आणि आपल्या  ज्ञानाच्या कक्षा वाढवाव्यात असे सांगितले. विद्यार्थी दशेत वाचन केलेले भविष्यामध्ये खूप उपयोगी होऊ शकते  म्हणून विद्यालयातल्या सर्व विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी व्हावे व आदर्श वाचकाचा आलमला पॅटर्न निर्माण करावा असे आवाहन केले .याप्रसंगी प्राथमिक स्वरूपात पाच विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते ग्रंथ वाटप करून गुलाब पुष्प देऊन मुलांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पर्यवेक्षक पी.सी. पाटील यांनी केले,  तर आभार भास्कर सूर्यवंशी यांनी मांडले. या कार्यक्रमास विवेकानंद वाचनालयाचे सिद्धलिंग निलंगेकर,  गणपत पावले , कंकर सिंग हजारी, महंमद शरीफ फाजल, शिवशंकर धाराशिवे , युवराज पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विवेकानंद वाचनालयाचे ग्रंथपाल सुरेश जाधव, सेवक शांतीरप्पा धाराशिवे,रामनाथ विद्यालयाचे ग्रंथपाल रामेश्वर सगर व रामनाथ विद्यालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

أحدث أقدم