लातूर काॅलेज आॅफ फार्मसीत रक्तदान शिबिर संपन्न

लातूर काॅलेज आॅफ फार्मसीत रक्तदान शिबिर संपन्न 


  औसा (प्रतिनिधी ) श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचलित लातूर कॉलेज ऑफ फार्मसी हासेगाव महाविद्यालयात प्राचार्या डॉ.श्यामलीला बावगे (जेवळे) यांच्या वाढदिवसा निमित्त आणि राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत श्रीमती सरस्वती कराड ब्लड सेंटर लातूर यांच्या संयुक्त विध्यमानाने रक्तदान शिबीर आयोजन करण्यात आले .या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी संस्थेचे अध्यक्ष  भीमाशंकर अप्पा बावगे ,सचिव वेताळेश्वर बावगे ,कोषाध्यक्ष शिवलिंग जेवळे,हासेगाव बी. फार्मसी च्या प्राचार्या डॉ. श्यामलीला बावगे (जेवळे) ,लातूर येथील श्रीमती सरस्वती कराड ब्लड सेंटरचे रक्त संक्रमण अधिकारी डॉ दाताळ बी.डी.,टेक्निकल सुपरवाजर विकास कारंजे,सोसिअल वर्कर अशोक जानराव, रक्त संकलन तंत्रज्ञ सुतार जी.जी, नरशिंग स्टाफ प्रकाश माने , क्लर्क अच्युत पाटील , सेवक बालाजी कराड इत्यादी मान्यवर उपस्थित होते. महाविद्यालयातील स्टाफ आणि विद्यार्थी यांनी खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत ,तब्बल ३१ बॅग लातूर कॉलेज ऑफ फार्मसी मधून रक्त दान करण्यात आले .                 

                 श्रीमती सरस्वती कराड ब्लड सेंटरचे रक्त संक्रमण अधिकारी डॉ दाताळ बी.डी. यांनी एका रक्तदानामुळे दोन जीव जगतात व रक्तदानामुळे शरीराला होणारे फायदे सांगून सगळे मिळून मानवहितार्थ कार्य करू चला आपण रक्तदान करू . अशा प्रकारे आपले मनोगत व्यक्त केले .
                          यावेळी संचालक नंदकिशोर बावगे ,महाविद्यालयातील रा.से.यो. चे कार्यक्रम अधिकारी गणेश बनसोडे, लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी ,हासेगाव ,ज्ञानसागर विद्यालय हासेगाव लातूर कॉलेज ऑफ फार्मसी हासेगाव राजीव गांधी पॉलिटेक्निक कॉलेज , लातूर कॉलेज ऑफ औधोगिक प्रशिक्षण संस्था , गुरुनाथ अप्पा बावगे इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल , लातूर कॉलेज ऑफ सायन्स, लातूर ,लातूर कॉलेज ऑफ फार्मसी,लातूर , या सर्व युनिट चे प्राचार्य, श्री वेताळेश्वर शिक्षण संकुलातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विध्यार्थी उपस्थित होते

Post a Comment

أحدث أقدم