शिक्षण संचालकांनी केली विद्यार्थी गुणवत्ता पहाणी

शिक्षण संचालकांनी केली विद्यार्थी गुणवत्ता पहाणी


लातूर- महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद पूणे येथील शिक्षण संचालक कौस्तुभ    दिवेगावकर  यांनी लातूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्रशाला तांदुळजा शाळेस पंतप्रधानांच्या परिक्षापे चर्चा लाईव्ह कार्यक्रमावेळी भेट दिली.यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा परिषद लातूर चे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, शिक्षण उपसंचालक लातूर डॉ.गणपत मोरे, सहाय्यक संचालक दत्तात्रय मठपती,डायट मुरुडच्या जेष्ठ अधिव्याख्याता डॉ.भगिरथी गिरी, रमेश ठाकूर, योगेश सुरवसे, सतीश भापकर, निशिकांत मिरकिले, लातूर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी संजय पंचगल्ले, केंद्रप्रमुख भास्कर माळी यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी शिक्षण संचालक महोदयांनी शाळेतील विद्यार्थ्यांचे भाषा,गणित आदी विषयांवर आधारित कृतीच्या व प्रात्यक्षिकाच्या  माध्यमातून गुणवत्ता पहाणी केली व समाधान व्यक्त केले.यावेळी लातूर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या बाला उपक्रमाविषयी गटशिक्षणाधिकारी संजय पंचगल्ले यांनी जीवन शिक्षण मासीकात लिहिलेला लेख व उपक्रमावर आधारित रंगनाथ सगर यांनी लिहिलेले 'माझा वर्ग यशस्वी मार्ग' हे पुस्तक भेट देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.

Post a Comment

أحدث أقدم