रब्बी हंगामासाठी सिंचन प्रकल्पातील पाणी मागणीचे अर्ज सादर करण्याचे आवाहन

 रब्बी हंगामासाठी सिंचन प्रकल्पातील पाणी मागणीचे अर्ज सादर करण्याचे आवाहन

लातूर- लातूर पाटबंधारे विभाग क्र. एक अंतर्गत मांजरा प्रकल्प, तेरणा प्रकल्प या मोठ्या प्रकल्पांसह तावरजा प्रकल्प, मसलगा प्रकल्प या मध्यम प्रकल्पातील आणि 33 टक्केपेक्षा जास्त जिवंत पाणीसाठा असलेल्या लघु प्रकल्प, साठवण तलाव व बॅरेजस मधील पाणी सिंचनासाठी मागणीचे अर्ज सादर करण्याचे आवाहन लातूर पाटबंधारे विभाग क्र. एक मार्फत करण्यात आले होते. मात्र, कार्यक्षेत्रातील लाभधारकांकडून अद्यापही पुरेसे अर्ज प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे संबंधित प्रकल्पातील लाभधारकांनी तातडीने पाणी मागणी अर्ज सादर करावेत, असे आवाहन लातूर पाटबंधारे विभाग क्र. एकचे उपकार्यकारी अभियंता सु. अ. जगताप यांनी केले आहे.

सिंचन प्रकल्पातील पाणीसाठा उपलब्धनुसार, प्रकल्पीय पीक रचनेनुसार पाणी देण्याचे नियोजन आहे. संबधित प्रकल्पातील पाणीसाठा व प्रकल्पीय पीक रचना व प्रकल्पनिहाय देण्यात येणाऱ्या पाणीपाळीची माहिती संबधीत शाखा  कार्यालयात पहावयास मिळेल. तसेच सद्यस्थितीत  लातूर पाटबंधारे विभाग क्र. एक अंतर्गत अत्यंत कमी प्रमाणात कर्मचारी असून प्रत्येक शाखा कार्यालयात केवळ एक ते दोन कर्मचारी कार्यरत असल्याने शेतकऱ्यांनी स्वत: पुढाकार घेवून शाखेत किंवा उपविभागविभागीय कार्यालयात येवून  सिंचनासाठी पाणी मागणी करावी,  तसेच ज्या-ज्या ठिकाणी शक्य असल्यास शाखेतील कर्मचाऱ्यांकडून ग्रामपंचायत  कार्यलयात प्रत्यक्ष पाणी मागणी अर्ज उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात येणार आहे, असे जगताप यांनी कळविले आहे.

Post a Comment

أحدث أقدم