मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अंतर्गत अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन

 मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अंतर्गत अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन


लातूर : मराठी भाषेच्या प्रचार व प्रसारासाठी 14 जानेवारी ते 28 जानेवारी 2023 दरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागजलसंपदा विभाग आणि मृद व जलसंधारण विभागाच्या संयुक्त विद्यमाने 24 जानेवारी 2023 रोजी विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या तारखेत बदल करण्यात आले असून आता या स्पर्धा 26 जानेवारी 2023 रोजी होतील, असे सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता डॉ. सलीम शेख यांनी कळविले आहे.

मराठी भाषा पंधरवडा अंतर्गत सर्व स्पर्धा बांधकाम भवन येथील सार्वजनिक बांधकाम मंडळ सभागृहात होणार आहेत. सकाळी अकरा वाजता हस्ताक्षर स्पर्धा, सकाळी सव्वाअकरा वाजता शुद्धलेखन स्पर्धा, दुपारी बारा वाजता निबंध स्पर्धा, सकाळी साडेअकरा वाजता काव्यलेखन, दुपारी साडेबारा वाजता युनिकोड लिपी टंकलेखन करण्याची स्पर्धा, दुपारी एक वाजता अभिवाचन स्पर्धा, दुपारी दीड वाजता माझ्या आयुष्यातील संस्मरणीय घटना याबाबत तीन ते पाच मिनिटे बोलणे, दुपारी तीन वाजता ‘शालेय शिक्षण मराठीतून की इंग्रजीतून’ या विषयावर वादविवाद स्पर्धा, दुपारी साडेतीन वाजता अंताक्षरी स्पर्धा होणार आहेत. कार्यक्रमाचा समारोप सायंकाळी पाच वाजता शासकीय विश्रामगृह येथे होईल. अधिकारी व कर्मचारी यांना मराठी साहित्याची पुस्तके खरेदी करण्यासाठी 'पुस्तक स्टॉलही लावण्यात येणार आहे.

स्पर्धेमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागजलसंपदा विभाग तसेच मृद व  जलसंधारण विभागाच्या अधिपत्याखालील मंडळ, विभाग, उपविभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपली     प्रवेशिका लातूर सार्वजनिक बांधकाम मंडळातील प्रथम लिपिक तुकाराम घंटे (भ्रमणध्वनी क्र. 9822693191) (सा.बा. विभाग व मृद व जलसंधारण विभागासाठी),  लातूर पाटबंधारे विभाग क्र. एकचे प्रथम लिपिक नितिन गायकवाड (भ्रमणध्वनी क्र. 8668269006) (जलसंपदा विभागाकडे) यांच्याकडे विहित नमुन्यात 25 जानेवारी 2023 दुपारी दोनपर्यंत सादर कराव्यात.

सर्व कार्यक्रमांचे आयोजन औसा सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपअभियंता ओ.डी.सारडाउपअभियंता संजय सावंत व सहायक अभियंता श्रेणी-1 श्री. देवशटवार तसेच जलसंपदा विभागाचे उपकार्यकारी अभियंता विजय औंढेउपअभियंता श्रीमती सुनंदा जगताप यांच्या सहकार्याने करण्यात येणार आहे.

Post a Comment

أحدث أقدم