प्रजासत्ताक दिनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न

 प्रजासत्ताक दिनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न



 आलमला. आलमला ता.औसा जिल्हा लातूर येथे 74 व्या  प्रजासत्ताक  दिनाचे औचित्य साधून गावातील श्री किरण गणपती लांडगे मुंबई शहर पोलीस हवालदार यांच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण झाल्यानंतर लातूर येथील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर शीतल पाटील यांच्या शुभहस्ते आलमला गावातील विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थी ,आदर्श शिक्षक ,सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार ,प्रगतिशील शेतकरी, यशस्वी उद्योजक. गावातील विविध संस्थेचे पदाधिकारी,विविध क्षेत्रातील अधिकारी अशा एकूण 50 मान्यवरांचा त्यांना सुंदर अशी आकर्षक ट्रॉफी व गुलाब पुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.याप्रसंगी गावातील जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी, रामनाथ शिक्षण संस्थेतील विद्यार्थी गुणांनुक्रमे गुणवत्ता यादीत आल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला .डॉक्टर शीतल पाटील यांनी सर्व गुणवंतांना व ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.  आरोग्याची काळजी कशी घ्यावी याविषयी मार्गदर्शन केले आपणही गुणवंत बनण्यासाठी सतत प्रयत्नशील असावे. असा कार्यक्रम ग्रामीण भागात पाहून मी खूप आनंदी झालो आहे कोरोना काळातील कांहीं आठवणी सांगितल्या . या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री कैलास निलंगेकर यांनी केले तसेच या कार्यक्रमाचे आयोजक श्री किरण लांडगे यांनी हा गुणीजनांचा सत्कार करण्या पाठीमागची आपली भूमिका व गावाविषयीची भावना आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्याची संधी मला मिळाली म्हणून मी खूप भाग्यवान आहे असे गौरव उद्गार काढले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरपंच कैलास निलंगेकर उपसरपंच. खंडेराव कोकाटे .विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन विश्वनाथ बिराजदार व्हाईस चेअरमन अहमद तांबोळी यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमासाठी अडवोकेट उमेश पाटील अध्यक्ष रामनाथ शिक्षण संस्था अलमला श्री बसवराज धाराशिवे सचिव विश्वेश्वर शिक्षण संस्था जय शंकर हुरदळे माजी संचालक मांजरा कारखाना सुरेंद्र पो.पाटील प्रभाकर कापसे ग्रंथ मित्र सौ अनिता पाटील मु.अ रामनाथ विद्यालय   वामन राठोड मु.अ जिल्हा परिषद अलमला जिल्हा बँकेचे व्यवस्थापक शिवकुमार स्वामी साहेब.शिवकुमार पाटील शालेय समिती अध्यक्ष जिल्हा परिषद अलमला ,भागवत सोनवणे तलाठी,सिताराम राठोड ग्राम अधिकारी आलमला, सूर्यकांत जाधव ग्रंथपाल पत्रकार महादेव कुंभार ,ग्रामपंचायतचे सर्व सदस्य सोसायटीचे सर्व सदस्य व असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते याप्रसंगी एकूण पन्नास व्यक्तींना आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पी सी पाटील व सुरज स्वामी यांनी केले या कार्यक्रमास असंख्य ग्रामस्थ जिल्हा परिषद व रामनाथ विद्यालयातील सर्व विद्यार्थी प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि पुरस्कार प्राप्त वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم