भाजपाचे प्रा. किरण पाटील यांना लातूर जिल्ह्यातून मोठे समर्थन!
लातूर - मराठवाडा शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपा आणि मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रा. किरण पाटील यांनी नुकताच दौरा करुन लातूर शहरासह जिल्ह्यातील अनेक शाळांना भेटी दिल्या. यावेळी कोणत्याही परिस्थितीत बदल करणार असल्याचे ठिकठिकाणी शिक्षक मतदारांनी बोलून दाखवले.
भाजपा, बाळासाहेबांची शिवसेना, रिपाई (आ), शिवसंग्राम, रयत क्रांती संघटना आणि शिक्षक परिषदेचे अधिकृत उमेदवार प्रा. किरण पाटील यांनी दोन दिवस लातूर शहरातील आणि जिल्ह्यातील अनेक शिक्षण संस्थांना, शाळा, कॉलेजला भेटी दिल्या. यावेळी त्यांच्या समवेत भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड, खा. सुधाकर शृंगारे, प्रदेश भाजपाचे विनायकराव पाटील, सुधाकरराव भालेराव, अरविंद पाटील निलंगेकर, गोविंदअण्णा केंद्रे, गणेशदादा हाके, शैलेश लाहोटी, गुरुनाथ मग्गे, संजय दोरवे, दिलीपराव देशमुख, रामचंद्र तिरुके, अशोककाका केंद्रे, विक्रमकाका शिंदे, बापूराव राठोड, राहुल केंद्रे, संतोषअप्पा मुक्ता, अमोल पाटील, बस्वराज बागबंदे, शिवाजी बैनगिरे, हनुमंत देवकते, बस्वराज रोडगे, मनोज पुदाले, श्रीमती रेखाताई तरडे, मीनाताई भोसले, दिग्विजय काथवटे, अॅड. ज्ञानेश्वर चेवले, सिद्धेश्वर मामडगे यांच्यासह लातूर शहर आणि ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधी भाजपाचे पदाधिकारी प्रचार दौऱ्यात सहभागी झाले होते.
या दौऱ्यात लातूर शहरातील शाहू कॉलेज, दयानंद कॉलेज, महात्मा बसेश्वर कॉलेज, कॉक्सिट, जयक्रांती, ज्ञानेश्वर विद्यालय, सरस्वती विद्यालय., चाकूर येथील भाई किशनराव देशमुख विद्यालय, विलासराव देशमुख विद्यालय, संजीवनी विद्यालय चापोली., अहमदपूर येथील महात्मा फुले, यशवंत विद्यालय, रविंद्रनाथ टागोर विद्यालय, महात्मा गांधी महाविद्यालय, किलबिल विद्यालय, उदगीर येथील उदयगिरी कॉलेज, शिवाजी महाविद्यालय, हावगीराव स्वामी महाविद्यालय, श्यामलाल कन्या विद्यालय यासह विविध शाळा महाविद्यालयांना भेटी दिल्या प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये संस्थाचालक शिक्षक मतदारांनी उमेदवारासह उपस्थित सर्व मान्यवरांचे मोठ्या उत्साहाने स्वागत केले.
प्रत्येक ठिकाणी झालेल्या बैठकीत उपस्थित भाजपाच्या मान्यवर नेते मंडळींनी राज्यात आणि देशात भाजपाचे सरकार असल्याने शिक्षकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रा. किरण पाटील यांनाच पहिल्या पसंतीचे मत देऊन बहुमताने विजयी करावे असे आवाहन केले तर गेल्या पंधरा वर्षात शिक्षण क्षेत्राशी निगडित अनेक प्रश्नांची सोडवणूक होऊ शकली नाही अशी माहिती देऊन उमेदवार प्रा. किरण पाटील यांनी आजपर्यंत केलेल्या कामाची माहिती दिली. येत्या काळात जुन्या पेन्शनसह विविध प्रश्न सोडवणुकीसाठी आपण आपले बहुमोल पहिल्या पसंतीचे मत देऊन मला काम करण्याची आणि आपली सेवा करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी असे आवाहन केले.
शिक्षक मतदार संघाच्या या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत बदल करण्याचा निर्धार प्रत्येक ठिकाणी शिक्षक मतदारांनी व्यक्त केला यामुळे लातूर शहरासह जिल्हाभरातून प्रा. किरण पाटील यांना मोठे मताधिक्य मिळेल अशी स्थिती या प्रचार दौर्यातून दिसून आली.
إرسال تعليق