कुष्ठरोग निवारण पंधरवडा अंतर्गत विविध उपक्रमांद्वारे होणार जनजागृती

 कुष्ठरोग निवारण पंधरवडा अंतर्गत विविध उपक्रमांद्वारे होणार जनजागृती

लातूर : 30 जानेवारी हा दिवस ‘कुष्ठरोग निवारण दिन’ म्हणून तसेच 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2023 पर्यंत कुष्ठरोग निवारण पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. या दरम्यान विविध उपक्रमांच्या माध्यमातून कुष्ठरोगाविषयी जनजागृतीसाठी करण्यात येणार आहे. यावर्षी ग्रामीण भागात 26 जानेवारी 2023 रोजी घेण्यात येणाऱ्या ग्रामसभेमध्ये ‘स्पर्श’ कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

यावेळी उपस्थितांना आरोग्य कर्मचारी, आशा कुष्ठरोग विषयक माहिती देतील. या स्पर्श जनजागृती अभियनाचे घोष ‘कुष्ठरोगविरुध्द लढा देऊन कुष्ठरोगाला इतिहास जमा करूयात’ हे आहे. ग्रामसभेत जिल्हाधिकारी यांच्या आवाहनाचे वाचनसरपंचांचे भाषण, कुष्ठरोगाबाबची प्रतिज्ञा, कुष्ठरोग जनजागृती कार्यक्रम, रोगमुक्त कुष्ठरुग्णांना ग्रामसभेस प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करणे, कुष्ठरोगाविषयी प्रश्न उत्तरे, जर कुष्ठबाधित व्यक्ती उपलब्ध असल्यास त्याचा सत्कार व त्याच्या मार्फत कुष्ठरोगविषयक संदेश वाचन करण्यात येणार आहे.

26 जानेवारी रोजी ध्वजारोहणानंतर जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयेसामान्य रुग्णालयेनगरपालिका दवाखानेमहानगरपालिका दवाखाने इतर विभागाची शासकीय, निमशासकीय कार्यालये शाळामहाविद्यालयेआश्रमशाळाअंगणवाडी येथे कुष्ठरोगाबाबची प्रतिज्ञा घेण्यात येणार आहे.

कुष्ठरोग निवारण पंधरवाडा कालावधीत कुष्ठरोग निर्मुलन होण्यासाठी जनजागृतीविषयक विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यामध्ये प्रभात फेरीम्हणी, पोस्टर व बॅनर लावणेदवंडीनाटकनुक्कडचा समावेश आहे. कुष्ठरोगाविषयी शास्त्रीय माहिती देवून समाजातील कुष्ठरोगाबाबतचे गैरसमज व अंधश्रद्वा दूर करण्याचा प्रयत्न या पंधरवड्यात होणार असल्याचे आरोग्य सेवा (कुष्ठरोग) सहायक संचालक यांनी कळविले आहे.

Post a Comment

أحدث أقدم