प्रा.बळीराम लहाने यांना पीएच.डी पदवी प्राप्त झाल्याबद्दल सत्कार

प्रा.बळीराम लहाने यांना पीएच.डी पदवी प्राप्त झाल्याबद्दल सत्कार



औसा: येथील श्री कुमारस्वामी  महाविद्यालयात कनिष्ठ विभागात कार्यरत असलेले प्रा. बळीराम शिवाजी लहाने यांना नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने मानव्य विद्याशाखे अंतर्गत भूगोल विषयात पीएचडी पदवी प्रदान केली. डॉ. ए. आर. बादाडे यांच्या मार्गदर्शनाखाली "औसा व शिरूर अनंतपाळ तालुक्यातील ग्रामीण वसाहतींचा तुलनात्मक अभ्यास" या विषयावर त्यांनी शोधप्रबंध सादर केला होता. या यशाबद्दल श्री महंतस्वामी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सद्गुरु गहिनीनाथ महाराज औसेकर, संस्थेचे सचिव गिरीश पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश्वर बेटकर, उपप्राचार्य डॉ. सुभाष मिसाळ, ग्रंथपाल प्रा. अंबादास खिलारे, पर्यवेक्षक प्रा. चंद्रकांत पाटील, महाराष्ट्र जुक्टा महासंघाचे राज्य उपाध्यक्ष प्रा. विलास जाधव, औसा तालुका जुक्टा अध्यक्ष प्रा. शिवराज मिटकरी, डॉ. संजय आष्टुरे, डॉ. गणेश मनगिरे, प्रा. नासिर पठाण, प्रा. पांडुरंग घुले, प्रा. रमाकांत साबदे, प्रा. राजकुमार पवार, प्रा. पंडित गुट्टे, प्रा. मनोज भोज, प्रा. मधुकर कदम, प्रा. रामप्रसाद महावरकर, प्रा. सुभाष इंदलकर, प्रा. अश्विन सुळकेकर,प्रा.नागेश सड्डू, प्रा. अर्चना शिंदे यांच्यासह सर्व  प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रा. बळीराम लहाने यांचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم