उदगीर येथे 10 फेब्रुवारी रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

 उदगीर येथे 10 फेब्रुवारी रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

लातूर : जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकतामार्गदर्शन केंद्र, उदगीर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्रद्वारा लातूर औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने 10 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी दहा वाजता उदगीर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव    मराठवाडा मुक्तिसंग्रामाचे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

या मेळाव्यात लातूरमुंबई, पुणे जिल्ह्यातील सहा आस्थपाना, उद्योजक यांनी एकूण 385  रिक्त पदे अधिसुचित केली आहेत. यामध्ये रांजणगाव पुणे येथील जबील सर्कीट इंडिया प्रा. लि. (साई श्रद्धा ग्रुप), मुंबई येथील एनआयआयटी लि (आयसीआयसीआय बँक), मदुरा मायक्रो फायनान्स, रांजणगाव पुणे येथील फियाट इंडिया ऑटोमोबाइल्स, लातूर येथील क्रेडीट असिस ग्रामीण लि, एमएस प्रॉपर्टी डेव्हलपर्स प्रा. लि या नामांकित आस्थापनांचा समावेश आहे. या आस्थापनांना इयत्ता सातवी, दहावी, बारावी, पदवीधर, एमबीए, आयटीआय, सिव्हील डिप्लोमा किंवा बी. ई. तसेच इतर व्यावसायिक शैक्षणिक पात्रतेच्या मनुष्यबळाची आवश्यकता आहे.

या रिक्त पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी 10 फेब्रुवारी रोजी सकाळी दहाला उदगीर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे स्वखर्चाने स्वतःचा रिझ्युम, बायोडाटा, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र आदी कागदपत्रांसह  मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. उदगीर तालूक्यातील तसेच लातूर जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी 02382- 299462 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे अवाहन जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त यांनी केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم