जवाहर नवोदय विद्यालयातील रिक्त जागांसाठी प्रवेश परीक्षा

जवाहर नवोदय विद्यालयातील रिक्त जागांसाठी प्रवेश परीक्षा

लातूर : जवाहर नवोदय विद्यालयातील इयत्ता नववीच्या रिक्त जागांसाठी 11 फेब्रुवारी 2023 रोजी लेखी प्रवेश परीक्षा होणार आहे. परीक्षा क्रमांक 179407 ते 179790 साठी लातूर जवाहर नवोदय विद्यालय हे परीक्षा केंद्र असून परीक्षा क्रमांक 179791 ते 180202 साठी संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूल येथे परीक्षा केंद्र असणार आहे.

जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावीसाठीच्या 80 जागांसाठी प्रवेश परीक्षा होवून विद्यार्थ्यांना इयत्ता बारावीपर्यंतचे शिक्षण नवोदय विद्यालयात दिले जाते. परंतुइयत्ता सहावी ते नववीपर्यंत जे विद्यार्थी विद्यालयातून आपले प्रवेश रद्द करतात, त्यांच्या जागा पुन्हा इयत्ता नववीमध्ये भरल्या जातात. यासाठी 11 फेब्रुवारी रोजी लेखी परीक्षा होणार आहे. परीक्षार्थींनी त्यांच्या प्रवेशपत्रावर नमूद केलेल्या परीक्षा केंद्रावर 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.30 वाजता उपस्थित राहावे .

प्रवेश परीक्षा लेखी स्वरूपाची असून या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा  प्रवेशपत्र www.navodaya.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध झाले आहे. परीक्षेवेळी या प्रवेशपत्राची  प्रिंट घेऊन येणे आवश्यक आहे. परीक्षा केंद्रावर जाण्यापूर्वी प्रवेशपत्रावर दिलेल्या सर्व सूचना काळजीपूर्वक पाहाव्यात. याबाबत अधिक माहितीसाठी प्रवेश परीक्षा प्रभारी बी. डी. शेख (भ्रमणध्वनी क्रमांक 9817834930) किंवा व्ही. एच. खिल्लारे (भ्रमणध्वनी क्रमांक 9860568840) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन लातूर जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य आर रामू यांनी केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم