जिल्ह्यातील 20 हजार घरकुल लाभार्थ्यांचा ग्रामस्तरावर मेळावा

 जिल्ह्यातील 20 हजार घरकुल लाभार्थ्यांचा ग्रामस्तरावर मेळावा

·       एकाच दिवशी 786 ग्रामपंचायतींमध्ये होणार चर्चासत्र

लातूर : गरिबांच्या घराचे स्वप्न वेळेत पूर्ण व्हावेयासाठी गावस्तरावर जिल्ह्यातील विविध योजनेतील घरकुल लाभार्थ्यांचा भव्य मेळावा 10 फेब्रुवारी 2023 रोजी होणार आहे. यामध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांसह सर्व घरकुल लाभार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे.

गेल्या दोन वर्षांपासून विविध योजनेतील घरकुल कामे मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. लातूर जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत 20 हजार 854 घरकुले मंजूर असून त्यापैकी हजार 523 घरकुले पूर्ण झाली आहेत. तर 1हजार 33घरकुले अपूर्ण आहेतरमाई आवास योजनेंतर्गत 24 हजार 532 घरकुले मंजूर असून 16 हजार 360 घरकुले पूर्ण झाली आहेत, तर हजार 172 घरकुले अपूर्ण आहेतदोन्ही योजनांची एकूण 19 हजार 503 घरकुले अपूर्ण आहेतही अपूर्ण असलेली घरकुले पूर्ण करण्यासाठी गावस्तरावर घरकुल लाभार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. 10 फेब्रुवारी 2023 रोजी जिल्ह्यातील सर्व गावात एकाच दिवशी घरकुल लाभार्थी मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

अपूर्ण असलेली घरकुले विविध स्तरावर प्रलंबित असून मिशन मोडवर ही घरकुले पूर्ण करावयाची आहेतत्यामुळे अमृत महाआवास अभियान 2022-2023 अंतर्गत घरकुल कामांना गती देण्यासाठी सर्व पंचायत समिती गणांसाठी नोडल अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहेज्या लाभार्थ्यांचे घरकुल अपूर्ण आहे त्यांचे समुपदेशनघराचे महत्वशासनाचे मिळणारे अनुदान यांची माहिती लाभार्थ्यांना सांगितली जाणार आहेतसेच ज्यांनी यापूर्वीच घरकुल बांधकाम पूर्ण केले आहे, त्यांचे मनोगत व प्रगतीपथावरील घरकुलांचीही सविस्तर चर्चा ग्रामस्तरीय मेळाव्यात होणार आहे. तरी सर्व घरकुल लाभार्थी यांनी मेळाव्यास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून मजूर घरकुले मार्च - 2023 अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक कल्पना क्षीरसागर यांनी केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم