एमपीएससी प्रशिक्षणासाठी 48 विद्यार्थ्यांची ‘महाज्योती’मार्फत निवड!

 एमपीएससी प्रशिक्षणासाठी 48 विद्यार्थ्यांची ‘महाज्योती’मार्फत निवड!

लातूर: नागपूर येथील महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योतीया संस्थेमार्फत महाराष्ट्रातील इतर मागास वर्गविमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील एकूण एक हजार 500 विद्यार्थ्यांना एमपीएससी परीक्षेचे प्रशिक्षण देण्यात येते. यापैकी 48 जागा रिक्त होत्याया रिक्त जागा भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालकांकडे मागणी केली होती.

‘महाज्योती’ने विद्यार्थ्यांच्या मागणीचा सकारात्मक विचार करून तातडीने निर्णय घेत रिक्त जागा भरण्यासाठी गुणानुक्रमानुसार 48 पात्र उमेदवारांची निवड यादी संकेतस्थळावरावर प्रसिध्द केली असून ‘महाज्योती’ने मागणी मान्य केल्याबद्दल उमेदवारांनी समाधान व्यक्त केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم