एकच मिशन जुनी पेंशन या मागणी करिता 29 घटक संघटनेचा दिनांक १४ मार्च २०२३ बेमुदत संप 100% सहभागी होवुन यशस्‍वी करण्‍याचा निर्धार

 एकच मिशन जुनी पेंशन या मागणी करिता 29 घटक संघटनेचा दिनांक १४ मार्च २०२३ बेमुदत संप 100% सहभागी होवुन यशस्‍वी करण्‍याचा निर्धार

 




महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्‍पीय  अधिवेशन सुरु होण्‍यापुर्वी मध्‍यवर्ती संघटनेने बेमुदत संपाची हाक दिली. त्‍या पार्श्‍वभुमीवर मंगळवार दि. २१ ऑगस्ट २०२३ रोजी संजय कलशेट्टी यांच्‍या अध्‍यक्षतेखाली  सरकारी-निमसरकारी-शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्‍वय समितीची बैठक पार पडली.  

 

सदर बैठकीमध्‍ये जिल्‍हा समन्‍वय समितीची पुर्नरचना करून सर्वसमावेशक जम्‍बो कार्यकारणी तयार करण्‍यात आली. बेमूद संपाच्‍या अनुषंगाने तालुकानिहाय प्रचार व प्रसार करून जनजागृती करण्‍याच्‍या दृष्‍टीने जिल्‍हा समिती नेमण्‍यात आली.

तसेच दि. ०३/०५/२०२३ रोजी जिल्‍हा मेळावा आयोजित करण्‍याचा एकमुखी ठराव देखील मंजुर करण्‍यात आला. जिल्‍हा मेळाव्‍यास जिल्‍ह्यातील मोठ्या संख्‍येने कर्मचारी बंधुनी सहभागी होण्‍याच्‍या  दृष्‍टीने तालुकानिहाय आराखडा तयार करण्‍यात आला. तसेच १४/०३/२०२३ पासून बेमूद संप यशस्‍वी होण्‍याच्‍या दृष्‍टीने रणनिती आखण्‍यात आली. तसेच भविष्‍याच्‍या दृष्‍टीने संघटनेमध्‍ये एकजुट राहण्‍याच्‍या निमित्‍याने महत्‍वाच्‍या विषयावर चर्चा करून निर्णय घेण्‍यात आले.

बैठकीमध्‍ये जुनी परिभाषित पेन्शन योजना ( OPS )" हक्काची लागू करण्यात यावी या मागणीबाबत अत्यंत त्वेषपूर्ण चर्चा झाली. महाराष्ट्र शासन या मागणीबाबत अत्यंत उदासिनतेने कार्यवाहीची पावले उचलताना दिसून येत असल्‍याच्‍या पार्श्‍वभुमीवर एकच मिशन जुनी पेंशन या मागणी करिता मध्‍यवर्ती संघटनेने पुकारलेल्‍या बेमुदत संपात 29 घटक संघटनेनी सहभागी होण्‍याचा एकमुखाने निर्धार करून बेमूदत  संप यशस्‍वी करण्‍याचा निर्णय घेतला.

बैठकीमध्‍ये समन्‍वय समितीचे बी.बी.गायकवाड (अध्‍यक्ष) एस.बी.कलशेट्टी (निमंत्रक) माधव एन. पांचाळ (अध्‍यक्ष महसूल कर्मचारी संघटना) महेश हिप्‍परगे (अध्‍यक्ष तलाठी संघटना) सुदेश परदेशी (अध्‍यक्ष पोलीस कार्यालयनी कर्मचारी संघटना) अनंत सुर्यवंशी (अध्‍यक्ष ग्रामसेवक संघटना) आरविंद कुलगुरले (राज्‍य सहसचिव जुनी पेंन्‍शन संघटना) धनंजय उजंमकर (प्रदेश कार्याध्‍यक्ष पंजाबराव देशमुख परिषद) गणपत रातोळे (मराठवाडा शिक्षक संघ)  गोविंद लाडेकर (उपाध्‍यक्ष भुमी अभिलेख कार्यालयीन कर्मचारी संघटना)  दिपक येवते (अध्‍यक्ष  लेखापरीक्षण विभाग संघटना) सय्यद वाजिद  (कोषागार कार्यालयीन कर्मचारी संघटना ) बालकराम शिंदे (अध्‍यक्ष सहकार संघटना) गणेश गंगणे (अध्‍यक्ष आय.टी.आय. संघटना)  संजीव लहाणे (सचिव  आरोग्य विभाग संघटना) व्हि.एम.परभणकर (अध्‍यक्ष संख्यिकी कार्यालयीन कर्मचारी संघटना) रेणुका गिरी (औसा तालुका आरोग्‍य कर्मचारी संघटना) उमाकांत सबनीस (अध्‍यक्ष मत्‍स्‍यव्‍यवसाय कर्मचारी संघटना) उमेश सांगळे (सचिव राज्‍य परिवहन कार्यालयीन संघटना) राहूल तुंगे (अध्‍यक्ष तंत्रनिकेन कार्यालयीन कर्मचारी संघटना) एस.डी महामुनी (अध्‍यक्ष कृषी कार्यालयीन कर्मचारी संघटना) धनंजय चामे (अध्‍यक्ष वन विभाग कार्यालयीन कर्मचारी संघटना)  बालाजी फड(अध्‍यक्ष समाज कल्‍याण कार्यालयीन कर्मचारी संघटना) सचिन श्रृंगारे (सार्वजनिक बांधकाम विभाग कर्मचारी संघटना) हाणमंत नागिमे (अध्‍यक्ष वस्‍तु व सेवा कर कर्मचारी संघटना) जी.पी. ऐनाडले (सचिव जिल्‍हा परिषद कर्मचारी महासंघ) बी.जे पोतदार (अध्‍यक्ष महाराष्‍ट्र राज्‍य विस्‍तार अधिकारी संघटना) विजयकुमार डोंगरे ( प्रतिनिधी लघु पाटबंधारे विभाग कर्मचारी संघटना) दिपक चिलोबा (अध्‍यक्ष तंत्रनिकेतन प्र.शाला कर्मचारी संघटना) विठ्ठल बडे (जिल्‍हा सचिव शिक्षक सहकार संघटना) आशोक केनिकर (सचिव धर्मदाय कार्यालयीन कर्मचारी संघटना) शरद हुडगे (अध्‍यक्ष शिक्षक सेना) मधुकर जोंधळे (मराठवाडा शिक्षक संघ) मोहाळकर जी.एस (विभागीय महिला संघटक) तसेच संवर्गनिहाय घटक संघटनेचे प्रतिनिधी यांनी सहभागी नोंदवून  बैठकी यशस्‍वी केल्‍या बद्दल संजय कलशेट्टी निमंत्रक जिल्‍हा समन्‍वय समिती ,लातूर यांनी आभार मानले.        

Post a Comment

أحدث أقدم