दयानंद कला महाविद्यालयात बारावी बोर्ड परीक्षार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत

 दयानंद कला महाविद्यालयात बारावी बोर्ड परीक्षार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत


ला. दि. २१ हळुवार सुमधुर बासरीचे सूर, रंगीबेरंगी रांगोळ्यांची आरास, विविध फुग्याने सजवलेला परिसर आणि प्रवेशद्वार अशा मंगलमय वातावरणात इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेतील परीक्षार्थीचे दयानंद कला महाविद्यालयात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. Covid-19 च्या प्रादुर्भावामुळे यावर्षी इयत्ता बारावी बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावी बोर्डाची परीक्षा देता आली नव्हती.त्यामुळे काही परिक्षार्थ्यांच्या मनात एक अनामिक भीती होती. हुरहुर होती. असे असले तरी विद्यार्थ्यांचे मनोबल उंचवावे व त्यांचा आत्मविश्वास जागृत करावा, तणावमुक्त व भीती मुक्त परीक्षा व्हावी या उदात्त हेतूने दयानंद कला महाविद्यालयाने या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन केंद्रसंचालक डॉ. दिलीप नागरगोजे यांनी केले होते.
       परीक्षार्थांच्या स्वागत समारंभ कार्यक्रमासाठी विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष                      मा. सुधाकरजी तेलंग यांना बोलविण्यात आले होते. त्यांनी आपला अमुल्य वेळ देऊन परिक्षार्थ्यांचे स्वागत केले.  सोबत मा. श्री. मंडळ अधिकारी नागनाथ वैद्य, हे ही उपस्थित होते.
तसेच दयानंद शिक्षण संस्थेचे संचालक अजिंक्य सोनवणे, प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड व उपप्राचार्य डॉ. प्रशांत मान्नीकर उपप्राचार्य अनिलकुमार माळी , माजी राज्य मंडळ सदस्य डॉ. संदीपान जगदाळे, तत्त्वज्ञान विभाग प्रमुख डॉ. सुनील साळुंके, इतिहास विभाग प्रमुख डॉ. रमेश पारवे, डॉ. नितीन डोके, डॉ. गोपाल बाहेती आदी उपस्थित होते.
       दयानंद शिक्षण संस्थे अंतर्गत बारावी बोर्डाचे एकूण चार केंद्र असून कला महाविद्यालयात 495 दयानंद वाणिज्य महाविद्यालयात 535 तर दयानंद विज्ञान महाविद्यालयात दोन केंद्र असून 865 व 592 असे एकूण  2487 परीक्षा देत आहेत. या परीक्षार्थ्यांचे स्वागतासाठी कु. गीता कवडे, देशमुख यांनी भव्य रांगोळी काढुन स्वागत केले. 
       कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. चंदेश्वर यादव,प्रा. सुरेश क्षीरसागर, प्रा. डॉ. प्रशांत दीक्षित,प्रा डॉ. दयानंद शिरूरे, प्रा जिगाजी बुद्रूके, प्रा शांता कोटे, प्रा विलास कोमटवाड, प्रा अंजली बनसोडे, प्रा महेश जंगापल्ले, प्रा. रत्नाकर केंद्रे  आदिंनी परिश्रम घेतले.

Post a Comment

أحدث أقدم