51 रक्तदात्यांनी रक्तदान करून दिली शिवरायांना मानवंदना भाडगाव येथे विविध उपक्रमांनी शिवजयंती साजरी

 51 रक्तदात्यांनी रक्तदान करून दिली शिवरायांना मानवंदना

भाडगाव येथे विविध उपक्रमांनी शिवजयंती साजरी

लातूर / प्रतिनिधी : लातूर तालुक्यातील भाडगाव येथे रविवार दि. 19 फेब्रुवारी रोजी 51 रक्तदात्यांनी रक्तदान करून शिवरायांना मानवंदना करत विविध उपक्रमांनी अतिशय उत्साहात शिवजयंती साजरी केली आहे. यामध्ये विविध शालेय स्पर्धा, शिवव्याख्यान, रक्तदान शिबीर आदी विविध सामाजिक उपक्रमा राबविण्यात आले. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात जवळपास 51 रक्तदात्यांनी रक्तदान करुन आपली छत्रपती शिवरायांप्रति आपली कृतज्ञता व्यक्त केली.
शिवजयंती निमित्त भाडगाव येथे श्री शिवछत्रपती सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने  सुप्रसिध्द शिवव्याख्याते प्रा.डॉ.गणेश बेळंबे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. प्रा. बेळंबे यांनी आपल्या अमोघ मनमोहन वाणीतून उपस्थित सर्व महिला, पुरुष, युवक, आबालवृद्ध यांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमात शालेय स्पर्धेमध्ये विजेत्या स्पर्धकांना रयत प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामदास काळे व प्रा.डॉ. गणेश बेळंबे, सचिन साबदे, महादेव बसपुरे, लहू चामे, एकबाल शेख, गोविंद शिंदाळकर यांच्या हस्ते बक्षिस वितरीत करण्यात आले.
याशिवाय या कार्यक्रमात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन लातूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे नूतन पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे  यांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी लातूर कपडा बँकेचे कार्यकारी सचिव व रयत प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्यचे मार्गदर्शक सुनिलकुमार डोपे यांनी स्वतः सर्वप्रथम रक्तदान करुन शिबिराची सुरुवात केली.
लातूर ब्लड सेंटरच्या कर्मचार्‍यांनी रक्तसंकलनासाठी पुढाकार घेतला. यावेळी शिवजयंती समितीचे अध्यक्ष दत्ता भांबरे, उपाध्यक्ष  समाधान गरड, सचिव शुभम जगताप,  समिती सदस्य दत्ता जगताप, लहू चामे, गोविंद शिंदाळकर, सचिन साबदे, बालाजी चिंचोळे, धीरज भांबरे, पवन डोपे, संकेत शिंदाळकर, श्रीकांत साबदे, गुणवंत मोरे,बाळू जगताप, श्रीशैल्य चिंचोळे,शिवाजी जगताप, परशुराम नरवाडे,सतीश नरवाडे, परमेश्वर डोपे, लक्ष्मण शिंदाळकर,दगडु शेख, इकबाल शेख, गणेश पाटील, महेश डोपे, प्रवीण सुरवसे, राहुल गरड, बालाजी वाघमारे तसेच शिवजयंती उत्सवाचे सर्व पदाधिकारी,गावातील शिवभक्त व संयोजक मंडळ आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुनिलकुमार डोपे,  प्रास्ताविक लहू चामे यांनी तर आभार  प्रा.डॉ. बालाजी वाघमारे यांनी व्यक्त केले.

Post a Comment

أحدث أقدم