युवा भीम सेनेच्यावतीने माता रमाईंना अभिवादन

 युवा भीम सेनेच्यावतीने माता रमाईंना अभिवादन





 लातूर- त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त येथील युवा भीम सेनेच्यावतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
युवा भीम सेनेचे संस्थापक अध्यक्ष पंकज काटे यांच्या हस्ते तथागत गौतम बुध्द, विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सामूहिक बुध्दवंदना घेण्यात आली. कार्यक्रमासाठी उपस्थित महिलांना काटे यांच्यावतीने भोजनदान देण्यात आले. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष महेबूब सय्यद यांच्यासह प्रतिभाताई पंकज काटे, जयश्री कांबळे, पंचशीला बनसोडे, रेखा सुरवसे, सखू गंभीरे, प्रियंका कांबळे, शांता कांबळे, शीला कांबळे, शकुंतला कांबळे, कांता सरवदे, कांता काकडे, हिरकणी कांबळे, पुष्पा म्हस्के, सुकुमार कांबळे, कालिंदा वाघमारे, सत्यशीला सोमासे, निर्मला आपटे व परिसरातील महिला, तरुणींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Post a Comment

أحدث أقدم