रविकांत तुपकर यांच्यावर बुलढाण्यात लाठीचार्जचा स्वाभिमानी संघटनेकडून निषेध

 रविकांत तुपकर यांच्यावर बुलढाण्यात लाठीचार्जचा स्वाभिमानी संघटनेकडून निषेध

 औसा तहसील समोर अर्धनग्न आंदोलन






औसा/प्रतिनिधी- स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा नेते रविकांत तुपकर यांच्यावर बुलढाणा पोलिसांनी अमानुषपणे लाठीमार केला तसेच रविकांत तुपकर यांच्यासह २५ जणांवर खोटे गुन्हे दाखल करून शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यावर घोर अन्याय केला असून या घटनेचा औसा येथे स्वाभिमानी शेतकरी  संघटनेचे लातूर उस्मानाबाद संपर्कप्रमुख राजेंद्र मोरे व राजू कस्बे यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अर्धनग्न धरणे आंदोलन करून निषेध व्यक्त केला. रविकांत तुपकर यांच्यावरील खोटे गुन्हे परत घ्यावेत तसेच शेतकऱ्यांना सोयाबीन दरवाढ देऊन प्रधानमंत्री पिक विमा योजनेमध्ये सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ पिकविमा द्यावा अशी मागणी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तहसीलदार भरत सूर्यवंशी यांना निवेदनाद्वारे केली. लातूर उस्मानाबाद संपर्कप्रमुख राजेंद्र मोरे, शेतकरी युवा नेते राजू कसबे, नवनाथ भोसले, नंदकुमार सरवदे, दगडू बर्डे, संजय कसबे, सुरेश सूर्यवंशी, महेश पवार, गौतम कांबळे, गजानन कल्लुरे यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयासमोर अर्ध नग्न होऊन धरणे आंदोलन करून बुलढाणा येथील घटनेचा निषेध व्यक्त केला.

Post a Comment

أحدث أقدم