जी. के. जोशी (रात्रीचे) वाणिज्य महाविद्यालयाचे यश

जी. के. जोशी (रात्रीचे) वाणिज्य महाविद्यालयाचे यश 



लातूर प्रतिनिधी - श्री हरिहर प्रतिष्ठान संचलित गोविंदलाल कन्हैयालाल जोशी (रात्रीचे) वाणिज्य महाविद्यालय व गांधी रिसर्च फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गांधी विचार परिक्षेत नेहा पाखरे, सुमित पांचाळ,डॉ.सचिन प्रयाग यांनी मारली बाजी. 
                पदवी विभागातून नेहा पाखरे जिल्ह्यातून प्रथम, पदव्युत्तर विभागातून सुमित पांचाळ जिल्ह्यातून प्रथम व प्राध्यापक विभागातून डॉ. सचिन प्रयाग सर जिल्ह्यातून द्वितीय आले आहेत. विजेत्यांना गोल्ड मेडल , सिल्व्हर मेडल व प्रमाण पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. गांधी विचार परिक्षेच्या समन्वयक म्हणून डॉ. सुजाता चव्हाण मॅडम व प्रा. नयन भादुले-राजमाने मॅडम यांनी काम पाहिले.
             संस्थेचे सचिव धनराज जोशी, रमेश बोरा, लक्ष्मीकांत जोशी, प्राचार्य डॉ. सुजाता चव्हाण मॅडम, प्रा. नयन भादुले, डॉ. विद्यादेवी कांबळे, डॉ. आरेफ शेख, प्रा.कल्पना झांबरे, प्रा. अनिता चौधरी, प्रा. कपिल हनवते, प्रा. प्रीती पाचंगे,प्रा.गोरोबा माने, ग्रंथपाल मनीषा लातूरकर मॅडम, कार्यालयीन कर्मचारी विश्वजीत शिंदे सर, सुंदरलाल मैंदरकर, पवन शर्मा, इत्यादिंनी यशस्वी सदस्यांचे हार्दिक अभिनंदन केले. याप्रसंगी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم