'' मैं कोल्हापूर से आई हु'' म्हणत चिमुकल्यांनी जिंकली ग्रामस्थांची मने

'' मैं कोल्हापूर से आई हु'' म्हणत चिमुकल्यांनी जिंकली ग्रामस्थांची मने

किल्लारीत जयक्रांती इंग्लिश स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात 
        


किल्लारी प्रतिनिधी-   '' मैं कोल्हापूर से आई हु'' म्हणत येथील जयक्रांती इंग्लिश स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन निळकंठेश्वर मंदिर सभागृहात विविध कलागुणांच्या सादरीकरणाने उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवछत्रपती चॅरिटेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष निवृत्तीराव भोसले, लातूर महानगरपालिकेचे नगरसेवक तथा टॅलेंट सर्च कमिटी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे इम्रान सय्यद यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मुला, मुलींनी कोल्हापुरी लावणी नृत्य, कोळीगीत, योगा, सूर्यनमस्कार, मराठी, हिंदी भाषेतील देशभक्तीपर गाणे, भारतीय संस्कृती, रामायण, विविध बालगीत, गायन सादरीकरण केले. यावेळी शिव राज्याभिषेक व फॅशन शोचे आकर्षण ठरले. विविध उपक्रम सादर करून विद्यार्थ्यांनी आपले कलागुण व कौशल्य सर्वांसमोर सादर केले. आकर्षक सादरीकरणासाठी प्रसिद्ध असलेल्या या महोत्सवाने पालकांचे मन जिंकले. यावेळी प्रमुख पाहुणे, पदाधिकारी, मुख्याध्यापिका वैशाली दुधनी आदींनी मनोगत व्यक्त केले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष बसवराज दुधनी यांनी केले. सूत्रसंचालन सहशिक्षक शाहुराज जाधव यांनी केले. आभार प्रदर्शन अतुल पाटील यांनी मांडले.

यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली. 
यावेळी पालक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم