कवी सुरेश धोत्रे यांना २०२३ चा साहित्यरत्न पुरस्कार जाहीर

कवी सुरेश धोत्रे यांना २०२३ सालचा साहित्यरत्न पुरस्कार जाहीर



औसा- एक मैफिल कवितेची महाराष्ट्र राज्य तर्फे आयोजित २०२३ या वर्षीचा साहित्यरत्न पुरस्कार लातूर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध कवी सुरेश धोत्रे यांना जाहीर करण्यात आला आहे. सुरेश पांडुरंग धोत्रे लातूर जिल्ह्यातील मौजे दवणहिप्परगा येथील तरुण असून आपला उदरनिर्वाह करण्यासाठी पुणे येथे स्थायिक आहेत. अतिशय प्रतिकुल परिस्थितीतून पदवी पर्यंतचे शिक्षण घेणारे सुरेश धोत्रे हे कवी व उत्तम लेखक आहेत.
माणूस प्रीत तुझी जीवन मुक्या वेदना हे काव्यसंग्रह प्रकाशित असून एक हाती योद्धा हे जीवन चरीत्र प्रकाशित झाले आहे. सुरेश धोत्रे एक चांगल्या प्रतीचे गायक असून  यासोबतच ते एक चित्रकार आहेत. 
सुरेश धोत्रे हे आपली नोकरी सांभाळून साहित्याचा वसा  जपणारे होतकरू, तरुण वर्गासाठी आदर्शवादी म्हणून महाराष्ट्रात सर्वदूर परिचित आहेत. तरुण वर्गाच्या कलेला वाव देण्यासाठी तरुणांना एकत्रित करून साहित्य सारथी कला मंच ची स्थापना  केली असून व त्या माध्यमातून अनेक व्यक्तींचा पुरस्कार देऊन त्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी नेहमीच हातभार लावला आहे.तसेच तरुण व दुर्लक्षित राहणारे चित्रकार यांच्या कलेचा वारसा पुढे नेण्यासाठी त्यांनी My hobbies my business च्या माध्यमातून अनेक तरुण तरुणांना त्यांनी संधी उपलब्ध करून दिली आहे.साहित्यिक म्हणून परिचित असणारे सुरेश धोत्रे हे मुळात एक स्वाध्यायी आहेत, त्यासोबतच ते चांगले प्रवचनकार व आध्यात्मिक आहेत हे विशेष. एक मैफिल कवितेची साहित्य मंच च्या वतीने या सर्व कला गुणांची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.रविवार दिनांक १२ फेब्रुवारी २०२३ रोजी शिरुर जिल्हा अहमदनगर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.त्याबद्दल कवी सुरेश धोत्रे यांचे खुप खुप अभिनंदन आणि स्वर्ण पुष्पच्या वतीने पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

Post a Comment

أحدث أقدم