लातूरच्या डॉ. वर्षा महिंद्रकर यांना मेडी आयकॉन पुरस्काराने सन्मानित

 लातूरच्या डॉ. वर्षा  महिंद्रकर यांना मेडी आयकॉन पुरस्काराने सन्मानित






 लातूर प्रतिनिधी-मागील आठवड्यात हॉटेल ऑर्चिड पुणे येथे मेडिक्विन मिसेस महाराष्ट्र स्पर्धा घेण्यात आली होती.या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील विवाहित महिला डॉक्टरांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमात आपल्या क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या काही महिला डॉक्टरांना सन्मानित करण्यात आले. लातूर येथील डॉ. सौ.वर्षा सुनील महिंद्रकर यांना देखील मेडी आयकॉन अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार प्राप्त करणाऱ्या त्या लातूर येथील प्रथमच महिला डॉक्टर आहेत.हा पुरस्कार त्यांना मराठी चित्रपट निर्माते दिग्दर्शक आणि अभिनेते म्हणून प्रसिद्ध असलेले आदिनाथ कोठारे यांच्या हस्ते देण्यात आला.त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहेत. डॉ. सौ.वर्षा महिंद्रकर या मागील 18 वर्षापासून वैद्यकीय सेवा देत आहेत.आपल्या कार्याप्रती आवड जिद्द व प्रबळ इच्छाशक्ती असेल तर यश नक्कीच मिळते असे त्यांनी व्यक्त केले. त्यांच्या या यशामागे परिवारातील थोरांचे शुभ आशीर्वाद, पती व मुलांची साथ तसेच रुग्णांचा त्यांच्यावर असलेला विश्वास हेच आहे,असे त्यांनी सांगितले डॉ.सौ. वर्षा महिंद्रकर यांना रुग्णसेवेबरोबरच समाज सेवेची पण अतिशय आवड आहे. असे त्यांच्या जीवनशैलीतून दिसून येतो.

Post a Comment

أحدث أقدم