नागरिकांच्या तक्रारींचा तातडीने निपटारा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्ष

 नागरिकांच्या तक्रारींचा तातडीने निपटारा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्ष

उस्मानाबाद- नागरिकांच्या तक्रारींचा तातडीने निपटारा व्हावा, प्रशासनात लोकाभिमुखता यावी, कारभार पारदर्शक व्हावा या उद्देशाने  जिल्हाधिकारी कार्यालयात   मुख्यमंत्री सचिवालय कक्ष सुरू डिसेंबर 2022 पासून कार्यान्वित आहे. या कक्षाची जबाबदारी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांवर असेल.  जिल्हा पातळीवर कामकाज अधिक लोकाभिमुख व्हावे, ग्रामीण भागातील प्रश्न तातडीने सुटावे या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्ष सुरू करण्याचे आदेश मुख्य सचिवांनी दिले आहे. त्यानुसार या कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. अप्पर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृह येथे आयोजित पत्रकार परिषदेच्या वेळी उपस्थित पत्रकारांना अशी माहिती दिली. या कक्षात मुख्यमंत्र्यांना उद्देशून असलेले अर्ज, निवेदन, तक्रार स्वीकारण्यात येतील. तसेच संबंधितांना पोहच पावती दिली जाईल. त्याचबरोबर आलेली तक्रार तातडीने संबंधित विभागाकडे वर्ग केली जाणार आहे. जिल्हाधिकारी कक्षाच्या कामाचा आढावा दर महिन्याच्या लोकशाही दिनात घेण्यात येणार आहे. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी हे ही उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم