भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचा उपक्रम ५५ गावांमध्ये भारतमाता पुजन


भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचा उपक्रम  ५५ गावांमध्ये भारतमाता पुजन


     लातूर/प्रतिनिधी: देशाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नियोजनानुसार भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या लातूर शाखेच्या वतीने रेणापूर तालुक्यातील ५५ गावात भारतमाता पूजन करण्यात आले.
    ७५ वर्षांपूर्वी देशाला स्वातंत्र्य मिळाले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक परिश्रमातून देशासाठी संविधान तयार करण्यात आले.२६ जानेवारी १९५० रोजी देशात संविधान लागू झाले.तो दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.
    देशाच्या स्वातंत्र्यानंतर १३ महिने मराठवाडा निजामाच्या राजवटीत होता.१७ सप्टेंबर १९४८ रोजी मराठवाडा मुक्त झाला.स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यवीरांचे स्मरण करणे व भारतमातेला वैभवाच्या उच्च शिखरावर नेऊन बसवण्यासाठी प्रयत्न करणे ही स्वातंत्र्यवीरांना श्रद्धांजली ठरेल. भारतीयांमध्ये सेवाभाव जागृत करण्यासाठी,भारतमातेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नियोजनानुसार हा कार्यक्रम संपन्न झाला.
    भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे उपाध्यक्ष जितेश चापसी यांच्या मार्गदर्शनात उपक्रम प्रमुख जितेंद्र जोशी,सहप्रमुख गुरुनाथ झुंजारे यांनी कार्यक्रम यशस्वी केले.श्री केशवराज शैक्षणिक संकुलातील ५० कर्मचाऱ्यांनी रेणापूर शहरासह पानगाव, बिटरगाव,खरोळा,पोहरेगाव, पळशी,दर्जी बोरगाव यासह ५५  गावांमध्ये भारतमाता पूजन केले. त्या-त्या ठिकाणी गावातील अबालवृद्धांसह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या.
    केशवराज विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रदीप कुलकर्णी, उपमुख्याध्यापक महेश कस्तुरे, पर्यवेक्षक दिलीप चव्हाण,संदीप देशमुख,बबन गायकवाड यांच्यासह संस्थेचे सभासद व कर्मचाऱ्यांनी यात सहभाग घेतला.

Post a Comment

أحدث أقدم