लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे स्वागत समारंभ


लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे स्वागत समारंभ



      लातूर- श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचलित  एस.व्ही.एस. एस. लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी महाविद्यालयात नवीन प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत  करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भालचंद्र हॉस्पिटलचे संचालिका स्त्री प्रसूती तज्ञ डॉ. सौ. सुचित्रा भालचंद्र यांच्या शुभहस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकर बावगे, कोषाध्यक्ष शिवलिंग जेवळे,सचिव वेताळेश्वर बावगे ,प्राचार्य डॉ.विरेंद्र मेश्राम प्राचार्य डॉ.श्यामलीला बावगे (जेवळे) प्राचार्य डॉ. श्रीनिवास बुमरेला उपस्थित होते.








   डॉ.वीरेंद्र मेश्राम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महाविद्यालयाचे सर्व माहिती व अंतिम व तृतीय वर्षाचा निकाल  शंभर टक्के लागला आहे आणि भविष्यामध्ये  फिजीओथेरपीचे महत्व सांगितले .
  त्याचप्रमाणे शिवलिंग जेवळे यांनी  संस्थेच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत चढता आलेख सांगितले. दररोज महाविद्यालयामध्ये ३० पेशंट ओपीडीला येऊन उपचार  घेतात आणि लातूर मधील चार नामांकित हॉस्पिटलमध्ये जाऊन अंतिम वर्षाचे विद्यार्थी प्रात्यक्षिक शिकत आहेत. तसेच महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी कधीही कमी पडणार नाही अत्याधुनिक पद्धतीने शिक्षण, ग्रंथालय ,नवनवीन फिजिओथेरपीच्या संदर्भात मशनरी यांच्या माध्यमातून उपचार  विद्यार्थी करत आहेत असे प्रतिपादन केले.



डॉ.सुचित्रा भालचंद्र यांनी मनोगत व्यक्त करत असताना बाळ जन्माला आल्यापासून ते शेवटपर्यंत मनुष्य जीवन जगत असताना फिजिओथेरपीची अत्यंत काळाची गरज आहे व प्रत्येक क्षेत्रामध्ये फिजीओथेरपिस्ट लागतो जसे की स्पोर्ट मध्ये अशी नव नवीन संकल्पना त्यांनी विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये महत्व सांगितले दर्जेदार शिक्षण ग्रहण करा असे प्रतिपादन केले.
   या कार्यक्रमाचे आभार डॉ.अर्निका जयपुरिया यांनी केले तर सूत्रसंचालन ग्रीष्मा शिंदे व सुनिधी शिंदे यांनी केले. या कार्यक्रमाला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते

Post a Comment

أحدث أقدم