दर्जेदार उच्च शिक्षणाकरिता एनपीटीइएल ,स्वयम् कोर्स विद्यार्थ्याकरिता अत्यावश्यक-प्रा.रमेश तडवी

 दर्जेदार उच्च शिक्षणाकरिता एनपीटीइएल ,स्वयम् कोर्स विद्यार्थ्याकरिता अत्यावश्यक-प्रा.रमेश तडवी

लातूर -नवीन शैक्षणिक धोरणानुसार दर्जेदार उच्च शिक्षणाकरिता एनपीटीएल स्वयंमसारखे आभासी माध्यमातून होणारे कोर्सेस विद्यार्थ्याकरिता महत्त्वपूर्ण आणि सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त आहेत असे प्रतिपादन येथील महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील इंग्रजी विभागातील प्रा.रमेश तडवी यांनी केले ,ते येथील महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील आय .क्यू. ए.सी विभागाच्या वतीने आयोजित एनपीटीएव जनजागृती कार्यशाळेत बीजभाषक म्हणून बोलत होते .या कार्यशाळेचे अध्यक्षस्थानी श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ संचालक श्रीकांतप्पा उटगे, प्राचार्य डॉ. दिनेश मौने, उपप्राचार्य डॉ. राजकुमार लखादिवे, आय .क्यू.ए.सी समन्वयक डॉ. आनंद शेवाळे आदी मान्यवर मंचावर विराजमान होते.
पुढे बोलताना प्रा.  तडवी म्हणाले की,आजच्या आधुनिक काळाला माहिती तंत्रज्ञानाचा,स्पर्धेचा काळचा काळ म्हणून आपण त्याला ओळखतो ,उच्च शिक्षणात यामुळे अमुलाग्र असे बदल होत आहेत कालपरत्वे विद्यार्थ्यांनी आपल्या सर्वांगीण विकासाकरिता नियमित अभ्यासक्रमासमावेत बहुभाषिक, आंतरविद्याशाखीय क्षेत्रातील नव नवीन ज्ञान ,विज्ञान ,तंत्रज्ञान, कौशल्यावर आधारित एनपीटीएल व स्वयंम यासारखे विविध आभासी तंत्रज्ञानातील कोर्सेस करण्याची गरज आहे त्यामुळे आपण आपले ज्ञान दर्जेदार व उत्तम करू शकतो  असे ऑनलाइन कोर्सेस  अभ्यासले तर विविध जागतिक दर्जाचे ज्ञान आणि व्यक्तिगत परीक्षेतील क्रेडिट ही यामधून भर पडते स्पर्धेत टिकण्याकरिता या कोर्सेसची नितांत आवश्यकता आहे या कोर्सेसमुळे सेवा आणि रोजगाराच्या अनेक संधी   प्राप्त होऊ शकते महात्मा बसवेश्वर महाविद्यालया मध्ये शिक्षण मंत्रालय, भारत सरकार द्वारे सुरू असलेल्या एनपीटीएल कोर्सचे नोडल एजन्सी घेण्यात आली असून मेंटार मेंटी सिस्टीम याविषयी उत्तमपणे सुरू असलेल्या कार्याची माहिती त्यांनी  उपस्थितांना दिली.
आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात अँड श्रीकांत उटगे म्हणाले की, जग नियमितपणे बदलत असते, काळानुरूपात आपणही आपल्या ज्ञानात, कौशल्यात नवीन ज्ञानाचा भर पाडणे आवश्यक आहे. आपले कौशल्य , ज्ञान  नवीन शैक्षणिक धोरणानुसार स्वतः अद्यावत ठेवावा लागेल तरच विद्यार्थी स्पर्धेत टिकेल त्यामुळे सर्वांनी नवसंशोधन, नव कौशल्य नवतेचा ध्यास घ्यावा असेही ते म्हणाले.
 या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्राचार्य डॉ.दिनेश मौने यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात ऑनलाईन कोर्सच्या महत्त्वावर भर देऊन जागतिक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सर्वांना आवाहन केले .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.राजकुमार लखादिवे यांनी केले तर उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार डॉ. आनंद शेवाळे यांनी मानले.

Post a Comment

أحدث أقدم