तुती व फळबाग लागवडी करिता परवाना मिळवून नर्सरी उभी करण्यासाठी पुढाकार घ्यावा-जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे

 तुती व फळबाग लागवडी करिता परवाना मिळवून नर्सरी उभी करण्यासाठी पुढाकार घ्यावा-जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे

उस्मानाबाद:- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये वैयक्तीक लाभाच्या योजनेमधुन तुती व फळबाग लागवड अभियान राबवण्यात येत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतक-यांच्या उन्नती व समृध्दीकरिता जिल्हा प्रशासनाने नरेगा अंतर्गत 10 हजार एक्कर क्षेत्रावर तुती लागवड व दहा हजार  एक्कर क्षेत्रावर फळबाग लागवडीचे उद्दीष्ट निर्धारित केलेले आहे. या उद्दीष्टाच्या प्राप्ती करिता पहिल्या टप्प्यात जुन 2023 मध्ये 5 हजार एक्कर क्षेत्रावर तुती लागवड व 5 हजार एक्कर क्षेत्रावर फळबाग लागवड करण्याचे नियोजन असून दुस-या टप्यात सप्टेंबर 2023  मध्ये 2023 एक्कर क्षेत्रावर तुती लागवड आणि 5 हजार  एक्कर क्षेत्रावर फळबाग लागवड करण्याचे उद्दीष्ट निर्धारित केलेले आहे.

सदर उद्दीष्टाच्या प्राप्ती करिता मोठ्या प्रमाणावर तुती रोपांची व फळरोपांची आवश्यकता भासणार आहे. माहे जुन 2023 करिता तुती लागवडीच्या अनुषंगाने कमाल साडे तीन कोटी तुती रोपे आवश्यक आहेत. तसेच दुस-या टप्प्यात सुध्दा माहे ऑगष्ट 2023 करिता तुती लागवडीच्या अनुषंगाने कमाल साडे तीन कोटी तुती रोपांची आवश्यक आहे. सदर तुती रोपांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असल्याने याकरिता पुणे, सोलापुर, सातारा, सांगली, कोल्हापूर, लातुर, बीड, उस्मानाबाद आदी जिल्ह्यातून तुती रोपे उपलब्ध करुन घेणे आवश्यक आहे. त्याकरिता त्याबाबतचे पुर्व नियोजन करण्यासाठी उपरोक्त नमुद सर्व जिल्ह्यातील नर्सरी धारकांची बैठक दिनांक 13 फेब्रुवारी 2023  रोजी सकाळी  11.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद येथील सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. उपरोक्त बैठकीकरिता नमुद जिल्ह्यातील नर्सरी चालकांना उपस्थित राहण्याबाबत याव्दारे जाहीर आवाहन करण्यात येत आहे.

तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील नर्सरी करु ईच्छिणा-या शेतक-यांना सुलभ पध्दतीने व जलद गतीने शासकीय परवाने उपलब्ध करुन देण्याबाबत आपल्या स्तरावरुन सत्वर कार्यवाही करण्याबाबत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी उस्मानाबाद व त्यांच्या अधिनस्त उप विभागीय कृषी अधिकारी यांना निर्देश देण्यात येतात. तसेच जास्तीत जास्त ईच्छुक शेतकरी यांना तुती रोपांकरिता आणि फळबाग लागवडी करिता मोठ्या प्रमाणावर नर्सरीची आवश्यकता असल्याने त्यांनी नर्सरी परवाना मिळवून नर्सरी उभी करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे  आवाहन याव्दारे जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गुप्ता  यांनी केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم