त्र्यंबकदास झंवर आदर्श ग्रंथालय कार्यकर्ता राज्यस्तरीय पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन

त्र्यंबकदास झंवर आदर्श ग्रंथालय कार्यकर्ता राज्यस्तरीय पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन 



लातूर :  लातूर जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने देण्यात येणाऱ्या कै. एड. त्र्यंबकदास झंवर आदर्श ग्रंथालय कार्यकर्ता राज्यस्तरीय पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन जिल्हा ग्रंथालय संघाच्या पदाधिकाऱ्यांनी एका प्रसिद्धिपत्रकान्वये  केले आहे. 
लातूर जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने प्रतिवर्षी  सार्वजनिक ग्रंथालय क्षेत्रात उकृष्ट कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यास कै. एड. त्र्यंबकदास झंवर आदर्श ग्रंथालय कार्यकर्ता राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. या पुरस्काराचे हे दुसरे वर्ष असून वर्ष २०२३ साठीच्या  या पुरस्कारासाठी विहित नमुन्यात प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. या पुरस्काराचे स्वरूप  अकरा हजार रुपये रोख, सन्मानपत्र  - सन्मानचिन्ह असे आहे. या पुरस्काराचे वितरण लातूर जिल्हा ग्रंथालय संघाच्या वार्षिक अधिवेशनात समारंभपूर्वक केले जाते. दिवंगत ग्रंथमित्र एड. त्र्यंबकदास झंवर यांचे राज्याच्या  सार्वजनिक ग्रंथालय चळवळीतील योगदान अतुलनिय  असे आहे. ग्रंथालय चळवळीला गती देण्याकामी त्यांनी आपल्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न केले. अशा या ऋषितुल्य व्यक्तिमत्वाच्या नावाने प्रतिवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. 
या पुरस्कारासाठी राज्यभरातील ग्रंथालय कार्यकर्त्यांनी दि. १५ फेब्रुवारी २०२३ पर्यंत आपले प्रस्ताव अध्यक्ष / कार्यवाह, जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय संघ कार्यालय हुतात्मा स्मारक, डॉ. आंबेडकर पार्क, लातूर या पत्त्यावर पाठवावेत,असे आवाहन लातूर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष हावगीराव बेरकीळे , कार्याध्यक्ष डॉ. ब्रिजमोहन झंवर, कार्यवाह राम मेकले यांसह  ग्रंथालय संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे

Post a Comment

أحدث أقدم