आंतरराष्ट्रीय मापदंडानुसार पार पडणार लातूर आयएमएची हाफ मॅराथॉन स्पर्धा

आंतरराष्ट्रीय मापदंडानुसार पार पडणार लातूर आयएमएची हाफ मॅराथॉन स्पर्धा 

 








 
लातूर :  लातूर आयएमएच्या वतीने  येत्या दि. ५ फेब्रुवारी २०२३ रोजी लातुरात विश्व सुपर मार्केट आयएमए हाफ  मॅराथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून ही स्पर्धा  आंतरराष्ट्रीय मापदंडानुसार पार पडणार आहे. या स्पर्धेसाठी तब्बल १ हजार ३०० स्पर्धकांनी आपली नावे  नोंदवली आहेत, हे विशेष. 
   लातूर आयएमएच्या वतीने मागील पाच वर्षांपासून लातुरात  ३ किमी, ५ किमी., व  १० किमी अंतराची मॅराथॉन स्पर्धा घेण्यात येत होती. यावर्षी या स्पर्धेत आता २१ किमी. या हाफ मॅराथॉन  चा समावेश करण्यात आला आहे.  त्यामुळे ही  हाफ मॅराथॉन   स्पर्धा ३ किमी., १० किमी. व २१ किमी. अशा  तीन टप्प्यात संपन्न होत  आहे. ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय मापदंडानुसार होणार आहे. प्रत्येक धावपटू स्पर्धकाला इलेक्ट्रॉनिक टाईमिंग चिप्स असलेले बिब देण्यात येणार आहेत. हे बिब  स्पर्धेसाठी पूर्वनोंदणी केलेल्या धावपटूंना लातूर ऑफिसर्स क्लब येथून शुक्रवार, दि. ३ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी  पाच ते दहा यावेळेत तसेच शनिवार, दि. ४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी पाच या वेळेत घेऊन जाणे आवश्यक आहे.  या स्पर्धेचे प्रायोजकत्व  भारती  आणि गित्ते ग्रुप, लातूर ऑफिसर्स क्लब, सनरीच  ऍक्वा ,कीर्ती गोल्ड, प्रा. मोटेगावकर यांचे आरसीसी क्लासेस हे आहेत. 
 या स्पर्धेला रविवारी, दि.  ५ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेपाच वाजता  बार्शी रोडवरील लातूर ऑफिसर्स क्लबपासून सुरुवात  होईल.  नागरिकांनी स्पर्धकांना   पीव्हीआर चौक, नवीन रेणापूर नाका  व छत्रपती चौक बायपास रोडवर येऊन धावपटूंना प्रोत्साहित करावे, असे आवाहन 
 आयएमएचे अध्यक्ष डॉ. कल्याण बरमदे, सचिव डॉ. मुकुंद भिसे, संयोजन समितीचे  डॉ. अजय जाधव, डॉ. चांद पटेल , डॉ. आरती झंवर, डॉ.  वैशाली टेकाळे,  डॉ.  सुधीर फत्तेपूरकर,  डॉ. ब्रिजमोहन झंवर,  डॉ. कांचन जाधव, डॉ. विमल डोळे, डॉ. शुभांगी राऊत,  डॉ. श्वेता काटकर यांनी केले आहे. 

Post a Comment

أحدث أقدم