वैचारिक शिवजयंती साजरी पोलीस अधिकाऱ्यांना शिवचरित्र वाटप

 वैचारिक शिवजयंती साजरी पोलीस अधिकाऱ्यांना शिवचरित्र वाटप

शिवराय मनामनात, शिवजयंती घराघरात 



\


मुरुम, ता. उमरगा, ता. २३ (प्रतिनिधी) : भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९३ व्या जयंतीनिमित्त मराठा सेवा संघ आयोजित मध्यवर्ती शिवजन्मोत्सव सोहळा समिती, मुरुम शहरच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी वैचारिक शिवजयंती साजरी करण्याच्या उदात्त हेतुने शिवरायांचा इतिहास प्रत्येकांपर्यत पोहचवण्याचा मानस ठेवून शिवचरित्राचे वाटप गुरुवारी (ता.२३) रोजी करण्यात आले. कुठलाही सण, उत्सव म्हणलं की पोलिस बंदोबस्त आलाच. सार्वजनिक कार्यक्रम म्हणलं की खाकी वर्दी आलीच. प्रत्येकाचा आनंद द्विगुणित होण्यासाठी आपला आनंद लपवून इतरांना आनंदित करण्यासाठी सद्रक्षणाय खलनिग्रहणाय प्रमाणे सदैव सक्षम व कटीबद्ध असणाऱ्या पोलिस प्रशासनाच्या या कौतुकास्पद गोष्टीमुळे शहरातील एक सामाजिक संघटन म्हणून आमच्या सर्वांचे कर्तव्य आहे की, जनतेच्या बंदोबस्तासाठी २४ तास उभा असणारा आपला हा रक्षक व त्यांनी दिलेल्या या सेवेची कृतज्ञता म्हणून आम्ही मराठा सेवा संघ आयोजित मध्यवर्ती शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने  पोलिस अधिकारी व सर्व कर्मचाऱ्यांना शिवचरित्र वाटप करुन वैचारीक शिवजयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी मुरुम पोलीस ठाण्याचे सपोनि डॉ. रंगनाथ जगताप, कार्यक्रमाचे आयोजक मोहन जाधव, मराठा सेवा संघाचे तालुका उपाध्यक्ष संजय सावंत, शहराध्यक्ष श्रीधर इंगळे, किरण गायकवाड, आनंद कांबळे, इमरान सय्यद, मारुती कदम, विशाल फणेपुरे उपस्थित होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करून करण्यात आले. प्रास्ताविक मोहन जाधव यांनी केले. डॉ. जगताप, आनंद कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजिंक्य मुरूमकर तर किरण गायकवाड यांनी आभार मानले.     

Post a Comment

أحدث أقدم