पुस्तकी ज्ञाना बरोबर, कला गुणांना पण महत्व द्यावा- सचिन भुजबळ

 पुस्तकी ज्ञाना बरोबर, कला गुणांना पण महत्व द्यावा- सचिन भुजबळ


जिल्हा परिषद शाळेचे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न






मुरूम ता.२२, येथील जिल्हा परिषद मुलांची शाळेत दि.२२ वार बुधवार रोजी जिल्हा परिषद मैदानात वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक  मधुकर ममाळे होते. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन बापूराव पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी नगर परिषद मुख्याधिकारी सचिन भुजबळ, मुरूम पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक पवन इंगळे, उमाकांत मंगरूळे,विजयकुमार कोळी,प्रमोद कुलकर्णी, श्रीकांत बेंडकाळे, दत्ता चटगे, महानंद कलशेट्टी, चांदपाशा गवंडी, व्यंकटराव चौधरी आदी मान्यवरांची उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या उपस्थितीत सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून द्वीपप्रजवलनाने पाटील यांच्या हस्ते वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रमाचे उद्घाटन झाले, यावेळी मनोगत पर बोलताना भुजबळ म्हणाले विद्यार्थ्यांनी फक्त पुस्तकी ज्ञानच आत्मसात करून नये तर त्याबरोबर क्रीडा, इतर कला-गुण ही अवगत करावे असे मत व्यक्त केले. शाळेचे वतीने मान्यवरांचे येतोचित्त सत्कार करण्यात आले, यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्तीचे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. मराठी,हिंदी गाण्याच्या तालावर विद्यार्थी कलाकारांनी सुंदर नृत्य सादर करून उपस्थितीत प्रेक्षकांचे मने जिंकली, यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी असंख्य गर्दी झाली होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शालेय व्यवस्थापन समिती, शालेय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

أحدث أقدم