लॉर्ड श्रीकृष्ण इंग्लिश स्कूल मध्ये महाशिवरात्री आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

 लॉर्ड श्रीकृष्ण इंग्लिश स्कूल मध्ये महाशिवरात्री आणि छत्रपती


शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी





लातूर परिसरातील मातोश्री कलावती प्रतिष्ठान संचालित लॉर्ड श्रीकृष्ण इंग्लिश स्कुल मध्ये

महाशिवरात्री आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला लॉर्ड शंकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन

शाळेच्या प्राचार्या दुर्गा भाताने, शाळेचे समन्वक रौफ शेख, रुपाली कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात

आले.

याप्रसंगी शाळेच्या शिक्षिका पूजा शिंदे यांनी महाशिवरात्री बाबत माहिती दिली.

महाशिवरात्री हा एक महत्त्वाचा सण आहे आणि तो भारतभर साजरा केला जातो. असे मानले जाते

की या दिवशी भगवान शिवाने तांडव सादर केले. भगवान शिवाचे भक्त या दिवशी त्यांचे

आशीर्वाद मिळविण्यासाठी उपवास करतात आणि विविध विधी आणि प्रार्थना करतात असे

सांगितले. महाशिवरात्रीच्या निमित्तानें शाळेचे विद्यार्थी कावळे अर्णव विठ्ठल, चौधरी यश

श्रीकृष्ण, खोत सार्थक सुर्यकांत, मोटे सोहम अशोक, झुंजारे गजानन भीमाशंकर, फड भाग्यवंत

बालाजी, काशीद पियुष दयानंद यांनी शिवशंकराची वेशभूषा साकारून त्यांच्या विषयी आपले

मनोगत व्यक्त केले.

शाळेचे शिक्षक दीपककुमार कांबळे यांनी शिवाजी महाराज यांच्याविषयी माहिती सांगितली.

भारतातील सर्वात शूर राजांपैकी एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय. ‘शिवजयंती’ अर्थात

छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव महाराष्ट्रात एखाद्या मोठ्या सणाप्रमाणे साजरा केला जातो.

महाराजांची स्वराज्य स्थापना, सामान्य जनते विषयी असलेले प्रेम, सर्व धर्मांचा आदर या विषयी

माहिती दिली. शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्तानें शाळेचे विद्यार्थी बंडगर शिवप्रसाद

सतीश, माळगे शिव निलेश, चौधरी उर्जित मुकेश, केंद्रे सर्वज्ञ विकास, चामे पार्थ प्रदीप, जाधव

ऋग्वेद रामचंद्र, इघारे सार्थक गजानन यांनी शिवाजी महाराज यांची वेशभूषा साकारून त्यांच्या

विषयी आपले मनोगत व्यक्त केले. शाळेच्या सर्व विद्यार्थ्यानी शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस

पुष्प अर्पण करून अभिवादन केले. सर्वांनी जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव च्या घोषणा

दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन शाळेचे शिक्षक रौफ शेख यांनी केले या कार्यक्रमाच्या

यशस्वीतेसाठी शाळेचे शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

أحدث أقدم