श्री केशवराज विद्यालयात राष्ट्रसंत गाडगे बाबा जयंती

 श्री केशवराज विद्यालयात राष्ट्रसंत गाडगे बाबा जयंती






 लातूर/प्रतिनिधी : येथील श्री केशवराज विद्यालयात राष्ट्रसंत गाडगेबाबा जयंती संपन्न झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  विद्यालयाच्या पर्यवेक्षिका श्रीमती अंजली निर्मळे तर प्रमुख अतिथी म्हणून शुभम पाटील, अभ्यासपूरक मंडळ प्रमुख श्रीमती करुणा गायकवाड यांची उपस्थिती होती.
     कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते शुभम पाटील यांनी संत गाडगेबाबा यांच्या बालपणाचे वर्णन केले. संत गाडगेबाबा यांनी दिवसा हातात झाडू घेऊन गावोगावी जाऊन परिसर स्वच्छ करण्याचे कार्य केले तर संध्याकाळी कीर्तनाच्या माध्यमातून लोकांचे मन आणि विचार स्वच्छ केले. याच पद्धतीने विद्यार्थ्यांनी आपला परिसर,शाळा स्वच्छ ठेवण्याचा संदेश पाटील यांनी दिला.
     या कार्यक्रमात श्रुती शेळगे, भार्गवी कुलकर्णी,प्राची नवगिरे, स्वरा परदेशी,लावण्या निलंगे, साईराज गोरे,स्वर्णीम मठपती या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.
     या कार्यक्रमाचे प्रास्ताविक, स्वागत आणि सूत्रसंचलन अक्षरा लटपटे व अनुष्का समशेट्टे या विद्यार्थीनींनी केले.आभार रोशनी शेख हिने मानले.कल्याण मंत्राने कार्यक्रम संपन्न झाला.
     कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक प्रदीप कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात उपमुख्याध्यापक,पर्यवेक्षक, कार्यक्रम प्रमुख गुरुनाथ झुंजारे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

أحدث أقدم