जिल्हा ग्राहक संरक्षण समितीवर दत्तात्रय मिरकले पाटील

 जिल्हा ग्राहक संरक्षण समितीवर  दत्तात्रय मिरकले पाटील 







लातूर/प्रतिनिधी:अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे लातूर जिल्हाध्यक्ष दत्तात्रय मिरकले पाटील यांची जिल्हा ग्राहक संरक्षण समितीवर सलग दुसऱ्यांदा निवड झाली.
  दत्तात्रय मिरकले यांनी आजवर अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हा संघटक,लातूर जिल्हा दक्षता समिती सदस्य,ग्राहक संरक्षण समिती सदस्य,अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यासचे जिल्हा संघटक,सहकार समिती सदस्य,विविका सेवा सोसायटी चेअरमन आदी पदे भुषवलेली आहेत.मागील २०वर्षांपासून ते सामाजिक कार्यात सहभागी आहेत.या कार्याची दखल घेत त्यांची जिल्हा ग्राहक संरक्षण समितीवर निवड करण्यात आली.
निवडीचे पत्र देताना जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
   ग्राहकांच्या हितासाठी तसेच जे व्यापारी अनुचित व्यापार करून ग्राहकाला फसवतात त्यावर अंकुश ठेऊन ग्राहक हितासाठी सतत प्रयत्न करू,अशी प्रतिक्रिया मिरकले यांनी निवडीनंतर बोलताना व्यक्त केली.
  या निवडीबद्दल कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

أحدث أقدم