हासेगाववाडीतील कुस्तीपटू बनला "कुमार महाराष्ट्र केसरी 2023"
लातूर /प्रतिनिधी- महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद सलग्न भारतीय कुस्ती संघ व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य क्रीडा परिषद यांच्या वतीने पै. सोनबा लवटे यांनी इचलकरंजी( जि कोल्हापूर) येथे कुस्ती स्पर्धेत ११० किलो वजन गटात कुमार महाराष्ट्र केसरी किताब पटकाविला. त्याला मानाचा चांदीची गदा प्रदान केले.हे यश जिल्ह्यातील हासेगाववाडी व हासेगाव पंचक्रोशीतील गत वैभव प्राप्त करून देणार आहे.
कुमार महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे २६ मार्च रोजी इचलकरंजी (जि.कोल्हापूर )येथे कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, अंतिम सामन्यात सोनबा लवटे यांनी पै आर्यन पाटील याला ०१-०८ या गुण फरकाने पराभूत करून विजय मिळविले.
" कुमार महाराष्ट्र स्पर्धेत -२०२३" विजेतेपद मिळविल्या नंतर पै.सोनबा लवटे यांचे श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था हासेगावचे अध्यक्ष भीमाशंकर बावगे, कोषाध्यक्ष शिवलिंग जेवळे,सचिव वेताळेश्वर बावगे,नंदकिशोर बावगे यांनी शाल व बुके देऊन सत्कार व कौतुक केले,सोबत दिलीप लवटे,महादेव लवटे, भालचंद्र शिंदे ,योगेश चव्हाण व संस्थेतील सर्व कर्मचारी उपस्थित होते .
إرسال تعليق